राहुल गांधींनी 9 सेकंदात 13 पुशअप मारले लोकांनी शेअर केले मिम्स, व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

काँग्रेसचे खासदार सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहेत. त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पुशअप्स मारताना दिसत आहेत. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा लोकांनी खूप मीम्स-विनोद शेअर केले.

तमिळनाडू: कॉंग्रेस नेते राहुल गांधी अनेकदा चर्चेत असतात. मग ते वक्तृत्व असो किंवा इतर कोणतेही कामासाठी असो. लोक त्यांच्याबद्दल नेहमीच बोलतच राहतात. पुन्हा एकदा काँग्रेसचे खासदार सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहेत. त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पुशअप्स मारताना दिसत आहेत. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा लोकांनी खूप मीम्स-विनोद शेअर केले.

काय प्रकरण आहे ते जाणून घ्या

कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या तामिळनाडूच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान ते आज सोमवारी कन्याकुमारी येथे पोहोचले. येथे रोड शो केल्यानंतर राहुल गांधी यांनी तरुण विद्यार्थ्यांची भेट घेतली. या दरम्यान कॉंग्रेसचे नेते अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसले. सर्व प्रथम, राहुल गांधी एका विद्यार्थ्यासह आयकिडो करताना दिसले. यानंतर एका विद्यार्थ्याने त्यांना पुश-अप करण्याचे आवाहन केले. यावर राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसमवेत स्टेजवर पुशअप केले. व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी 9 सेकंदात 13 वेळा नॉनस्टॉप पुशअप मारले आहे.

शशी थरूरांच्या इंग्रजीवर पाकिस्तानी कॉमेडियनने केलेला मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल 

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक राहुल गांधींची ही शैली पसंत करत आहेत तर काही लोक या व्हिडिओची थट्टा करतांना देखील दिसत आहेत ' पुशअप  केल्यानंतर राहुल बाबा गजनीसारखे वाटतात,'अशा कमेंट लोकांनी केल्या आहेत.

आता एक कोटी नवीन कुटुंबांना मिळणार विनामूल्य एलपीजी कनेक्शन; जाणून घ्या कसा करता येणार अर्ज 

 

 

संबंधित बातम्या