...तर समुद्राच्या शेतकऱ्यांचे दिल्लीत मंत्रालय का होवू शकत नाही?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

राहुल गांधी यांनी मच्छिमारांसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालयाची गरज व्यक्त केली. मच्छीमारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांविरोधात तीन कायदे केले आहेत, शेतकरी या देशाचा आधार आहेत.

पुद्दुचेरी: राहुल गांधी आज बुधवारी पुद्दुचेरी येथे आले आणि त्यांनी तेथील मच्छीमारांची भेट घेतली. मच्छीमारांशी झालेल्या भेटी दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने पास केलेल्या तीन कृषी कायद्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, “मी मच्छिमारांना समुद्राचे शेतकरी मानतो.” 

या व्यतिरिक्त राहुल गांधी यांनी मच्छिमारांसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालयाची गरज व्यक्त केली. मच्छीमारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "सरकारने शेतकऱ्यांविरोधात तीन कायदे केले आहेत, शेतकरी या देशाचा आधार आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी मच्छीमारांच्या सभेत शेतकऱ्यांविषयी का बोलत आहे? मी तुम्हा लोकांना समुद्राचे शेतकरी मानतो, जर जमीनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिल्लीत मंत्रालय असू शकते तर समुद्राच्या शेतकऱ्यांचे का नाही होवू शकत?" असा प्रश्न राहूल गांधी यांनी सभेत उपस्थित केला त्याशिवाय मच्छिमारांना विमा, पॅन अशा सुविधा देण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.

युरोपीय युनियनचे प्रतिनिधी जम्मू काश्मीरमध्ये दाखल -

पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणूकीपूर्वी कॉंग्रेसचे सरकार अल्पमतांमध्ये आली आहे. निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे चार आमदारांनी राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.  मंत्रिमंडळ विसर्जित करण्याऐवजी बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. इकडे किरण बेदी यांना राष्ट्रपतींनी एलजी पदावरून काढून टाकले आहे. पुद्दुचेरी विधानसभेत आता 30 आमदार आहेत. 2016 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. 

दरम्यान पुद्दुचेरी केंद्रशासीत प्रदेशाच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन दूर करण्यात आले आहे. आता तेलंगणाचे राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. पुद्दुचेरीसाठी नव्या नायब राज्यपालाची निवड होईपर्यंत टी. सुंदरराजन याच्यांकडेच ही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माध्यम सचिव अजयकुमार सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या