"गाडीत इंधन भरणे ही सुद्धा परीक्षाच"

"गाडीत इंधन भरणे ही सुद्धा परीक्षाच"
pariksha pe charcha.jpg

देशात सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत. देशातील बहुतांश ठिकाणी पेट्रोलने शंभरी गाठल्याचे पाहायला मिळते आहे. याच मुद्द्याला धरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांसाठी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमावर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान ताशेरे ओढले आहेत. (Rahul Gandhi has criticized Prime Minister Narendra Modi's Pariksha pe Charcha)

पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावर बोट ठेवत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी "गगनाला भिडणार्‍या इंधन दराच्या दरम्यान गाडीत तेल भरणे ही कोणत्याही कसोटीपेक्षा कमी नाही, म्हणून मोदींनी  लोकांच्या खिशाचा विचार करून खर्चा पे चर्चा  केली  पाहिजे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असून देखील देशात पेट्रोल डिझेलचे दर कमुनि होत नाहीत ही गोष्ट देखील त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ट्विट करताना राहुल गांधी यांनी  लिहिले की "केंद्र सरकारच्या कर वसुलीमुळे आता कारमध्ये इंधन भरणे एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही राहिले, मग पंतप्रधान ते या मुद्द्यावर का बोलत नाहीत? खर्चावरही चर्चा झाली पाहिजे."

महागाईबाबत कॉंग्रेस (Congress) प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवलेली पाहायला मिळते आहेत. "73 वर्षातील सर्वात महागडे आणि जुलमी सरकार (Central Government) असून शेतकऱ्यांवर रोज एक हल्ला करते." असे म्हणत मोदी सरकार जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केला आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com