राहुल गांधींनी पाळला 12 वर्षाच्या मुलाला दिलेला शब्द

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

कन्याकुमारीमध्ये 12 वर्षाच्या मुलाची भेट घेतल्यानंतर त्याला मदत करण्याचा शब्द दिला होता.

कन्याकुमारी: कॉंग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. कधी ते मच्छिमारांसोबत समुद्रात उडी मारल्यामुळे तर कधी पुशप्स काढल्यामुळे त्यांच्या बाबतीत अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा चालू असते. आता ही एका हटक्या कारणासाठी राहुल गांधी चर्चेत आले आहेत. कन्याकुमारीमधील 12 वर्षाच्या मुलाला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं आहे. कन्याकुमारीमध्ये 12 वर्षाच्या मुलाची भेट घेतल्यानंतर त्याला मदत करण्याचा शब्द दिला होता. अखेर राहुल यांनी या लहानग्याला दिलेला शब्द पाळला आहे.

मार्च महिन्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर असताना कन्याकुमारीला गेले होते. त्यावेळी त्यांना आपल्या गाड्याचा ताफा कन्याकुमारीमधील एका चहाच्या ठेल्याजवळ थांबवला होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला पायात चप्पल नसलेला अ‍ॅंटनी फेलिक्स नावाचा एक लहान मुलगा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचं पोस्टर हातात घेऊन थांबला असल्याचे राहुल यांनी पाहिले.

केरळमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका; चाको यांनी दिला राजीनामा

त्यानंतर राहुल गांधी त्या मुलाच्या दिशेने चालत गेले आणि त्याच्याशी संवाद साधला. त्याच्या सोबत बोलत असताना राहुल यांनी त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. तुला कशाची जास्त आवड आहे, अंस विचारल्यानंतर त्या मुलाने लगेच मला धावायला खूप आवडतं, असं उत्तर दिलं. इयत्ता पाचवीत असणाऱ्या फेलिक्सने आपण 100 मीटर धावण्याच्या शर्यतीतील उत्तम धावपटू असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

तो धावपटू असल्याचे राहुल यांना समजताच तू माझ्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकतो असा मजेशीर सवाल त्याला विचारला आणि तू पायात काही न घालताच धावतो का? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली. त्याचवेळी तुला लवकरच स्पोर्ट्स शूज पाठवून देतो असा शब्दही राहुल गांधी यांनी दिला होता. अखेर राहुल यांनी आपला शब्द पाळला आणि त्यांनी फेलिक्ससाठी नवीन स्पोर्ट्स शूज गिप्ट केले. तामिळनाडू युवा कॉंग्रेसने य़ा संबंधी ट्विट करुन माहिती दिली.

 

संबंधित बातम्या