तुम्हाला माहितीये का राहुल गांधींची संपत्ती, वाचा सविस्तर

नॅशनल हेराल्ड प्रकरणी मंगळवारी दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली.
तुम्हाला माहितीये का राहुल गांधींची संपत्ती, वाचा सविस्तर
Rahul GandhiDainik Gomantak

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी मंगळवारी दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित सुमारे दोन हजार कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) राहुल यांची चौकशी करत आहे. एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाला त्यांच्या निधीतून सुमारे 90 कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. दोन हजार कोटींच्या या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय राहुल गांधींकडून त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती घेत आहे.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्र दिले होते. यामध्ये त्यांनी मालमत्तेशी संबंधित संपूर्ण माहिती दिली. ज्यामध्ये राहुल यांनी सांगितले होते की, 'माझ्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्याचबरोबर माझ्यावर सुमारे 72 लाखांचे कर्ज आहे.' प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याकडे कार नसल्याचे सांगितले आहे.

Rahul Gandhi
'काँग्रेस अध्यक्ष पद कुणा एकाचा दैवी अधिकार नाही', राहुल गांधीं पुन्हा प्रशांत किशोरांच्या टार्गेटवर

इतकंच नाही तर राहुल गांधींनी शपथपत्रात आपली जंगम मालमत्ता 5 कोटी 80 लाख 58 हजार 799 रुपये असल्याचंही नमूद केलं आहे. त्याचवेळी स्थावर मालमत्ता 10 कोटी 8 लाख 18 हजार 284 रुपये आहे. म्युच्युअल फंड, शेअर्स आणि विविध बाँड्समध्ये त्यांनी सुमारे 5 कोटी 19 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी 2014 पर्यंत त्यांच्याकडे एकूण 9 कोटी 40 लाख रुपयांची संपत्ती होती. म्हणजेच पुढील पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत सुमारे साडेसहा कोटींनी वाढ झाली होती.

Rahul Gandhi
National Herald Case: सलग तिसऱ्या दिवशी होणार राहुल गांधींची ईडी चौकशी

राहुल गांधीकडेही शेती आहे, उत्पन्नाचे स्रोत

याशिवाय राहुल गांधींकडेही (Rahul Gandhi) शेतीही आहे. ही शेती दिल्लीच्या (Delhi) सुलतानपूर गावात आहेत, जी त्यांना वारसाहक्कानुसार मिळाली आहे. याशिवाय त्यांच्याकडे 333.3 ग्रॅम सोने आहे. 2017-18 पर्यंत त्यांचे एकूण उत्पन्न एक कोटी 11 लाख 85 हजार 570 रुपये होते. खासदार म्हणून मिळणारा पगार हा त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. याशिवाय त्यांना रॉयल्टीचे उत्पन्नही मिळते. त्यांना भाड्याचे पैसेही मिळतात. म्युच्युअल फंड आणि बाँड्स इत्यादींमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे व्याज आणि मॅच्युरिटी इन्कम देखील उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये समाविष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com