...आता सरकारने चीनने केलेल्या कब्जाचे सत्यही स्विकारावे: राहुल गांधींचा निशाणा

भारत (India) आणि चीनने (China) पूर्व लडाखमधील संघर्षाच्या इतर भागातून सैन्याच्या पूर्ण माघारीच्या पार्श्वभूमीवर लष्करी पातळीवरील चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर घेण्याचे मान्य केले.
...आता सरकारने चीनने केलेल्या कब्जाचे सत्यही स्विकारावे: राहुल गांधींचा निशाणा
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सरकारवर पुन्हा निशाणाDainik Gomantak

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)
यांनी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. मोदी सरकारने आता 'चीनच्या (China) कब्जाचे सत्यही स्वीकारले पाहिजे, असे म्हटले त्यांनी आहे. काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधी यांनी अनेकदा चीनच्या सीमेवरील तणाव हाताळण्याच्या पध्दतीवर सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सरकारवर पुन्हा निशाणा
डोकलाम जवळ भूतानच्या क्षेत्रात चीनने कब्जाकरत एका वर्षात वसविली 4 गावे

सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी ट्विट केले की, आता चीनच्या कब्जाचे सत्यही स्वीकारले सरकारने स्विकारले पाहिजे.

दुसरीकडे, भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील संघर्षाच्या इतर भागातून सैन्याच्या पूर्ण माघारीच्या पार्श्वभूमीवर लष्करी पातळीवरील चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर घेण्याचे मान्य केले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या विधानानुसार, सीमा प्रकरणांवर चर्चा आणि समन्वयासाठी (WMCC) कार्यप्रणालीच्या डिजिटल माध्यमातून झालेल्या बैठकीत, दोन्ही बाजूंनी वास्तविक रेषेवरील परिस्थितीबद्दल "स्पष्ट आणि सखोल" चर्चा केली. पूर्व लडाखमधील नियंत्रणाबाबत (LAC) शेवटच्या लष्करी स्तरावरील चर्चेनंतर तेथील घडामोडींवर चर्चा आणि आढावा घेतला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com