हुकुमशहांची नावं "M" अक्षरापासूनच का सुरू होतात? राहूल गांधींनी केला मजेशीर प्रश्न

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्यानमारमधील सत्ताबळाबाबत एक मजेदार प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी म्हणाले की बहुतेक हुकूमशहाची नावे इंग्रजीतील ‘एम’ अक्षराने का सुरू होतात?

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्यानमारमधील सत्ताबळाबाबत एक मजेदार प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी म्हणाले की बहुतेक हुकूमशहाची नावे इंग्रजीतील ‘एम’ अक्षराने का सुरू होतात? या प्रश्नाबरोबरच त्यांनी अनेक हुकूमशहा यांची नावेही काढली. इंग्रजीतील 'एम' या अक्षरापासून सुरू होणाऱ्या म्यानमारमधील सत्ता चालविणाऱ्या लष्करप्रमुखांचे नाव मिंग आंग ह्लाइंग आहे,

राहुल गांधी सारखे मोदींवर टिका करताना दिसतात परंतु यावेळेस राहुल गांधीनी नरेंद्र मोदीं यांना हुकुमशहाच्या यादीत बसवले आहे. आज पर्यत हुकुमशहा होवुन गेले त्या सर्वांची नावे  M या अक्षराने सुरुवात होतात, राहुल गांधीनी असे ट्वीट करत मोदींवर टीकास्र सोडले आहे.

राहुल गांधीनी जगातील हुकुमशहाची नावे व  राष्ट्राचा असे ट्टविट केले

  • मार्कोस फर्डिनांद (फिलिपाइन्स)
  • मुसोलिनी बेनिटो (इटली)
  • मिलोसेविक स्लोबोडन (युगास्लाव्हिया)
  • मुबारक होन्सी (इजिप्त)
  • मोबुतो सेसे सेको (कांगो)
  • मुशर्रफ परवेझ (पाकिस्तान)
  • मायकेंबेरो मायकल (बुरुंडी)

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्यानमारवर लष्कराचे राज्य आहे. सन 1962 मध्ये येथे सैन्य सत्तेवर आले. सैन्याच्या हुकूमशाहीपासून आणि लोकशाहीच्या जीर्णोद्धारापासून देशवासीयांच्या स्वातंत्र्यासाठी आंग सॅन सू की यांनी 22 वर्षांची लढाई लढाई लढविली होती, ज्यामुळे 2011 मध्ये निवडलेले सरकार स्थापन झाले.

संबंधित बातम्या