Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक, 'अज्ञाताने अचानक मारली मिठी...'

Rahul Gandhi Security Breach: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे.
Congress Bharat Jodo Yatra
Congress Bharat Jodo YatraDainik Gomantak

Rahul Gandhi Security Breach: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. पंजाबमधील होशियारपूर येथील तांडा येथे भारत जोडो यात्रेदरम्यान अचानक एका व्यक्तीने गर्दीत घुसून राहुल गांधींना मिठी मारली. मात्र, सुरक्षा कर्मचारी आणि सोबत असलेल्या काँग्रेस नेत्यांनी त्या व्यक्तीला तात्काळ हटवून वेगळे केले.

धावत येऊन थेट राहुलला मिठी मारली

पंजाबमधील होशियारपूरच्या तांडा परिसरातून भारत जोडो यात्रा जात असताना अचानक एक व्यक्ती धावत आला आणि त्याने थेट राहुल गांधींना मिठी मारली. हे पाहून पंजाबचे प्रमुख अमरिंदर राजा वाडिंग यांच्या मदतीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्या व्यक्तीला दूर ढकलले. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडून बाजूला नेले.

Congress Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra: राहुल गांधीची भारत जोडो यात्रा स्थगित, कारण...

राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत एजन्सींनी अलर्ट जारी केला आहे

सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंदर्भात अलर्ट जारी केला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान काही ठिकाणी न फिरण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) काही ठिकाणी फिरणे टाळावे, अशी माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधींना पायी न जाता कारने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.

Congress Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत सहभागी होणार भाजपचा 'हा' दिग्गज नेता? पण...

कन्याकुमारी ते काश्मीर असा राहुल गांधींचा प्रवास

7 सप्टेंबर 2022 रोजी राहुल गांधींनी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरु केली आणि ती जम्मू-काश्मीरपर्यंत जाईल. यादरम्यान राहुल 150 दिवसांत 3750 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत. राहुल यांच्या या दौऱ्यात 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com