राहुल गांधींनी द्याव्यात फिटनेस टिप्स; एका फोटोमुळे का होतेय चर्चा?
Rahul Gandhi should give fitness tips Why is a photo causing a discussion

राहुल गांधींनी द्याव्यात फिटनेस टिप्स; एका फोटोमुळे का होतेय चर्चा?

कोल्लम : कॉंग्रेस नेते राहुल गांधी सोशल मिडियावर बऱ्याचवेळा त्यांच्या वक्तव्यामुळे ट्रोल होत असतात. मात्र आता राहुल गांधींचा केरळमध्ये मच्छिमारांसमवेत समुद्रात मारलेली उडीचा किस्सा इंटरनेटवर चर्चेला जात आहे. 'फिशिंग ट्रिप' मधील त्यांचे फोटो पाहिल्यानंतर यावर लोकांनी कमेंट केल्या आहेत. राहुल गांधींनी ओला टि-शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. यात त्यांचे अब्स दिसत आहेत.

बॉक्सर विजेंदरसिंग याने यावर ट्विटवरुन आपली प्रतिक्रीया दिली आहे, ''हे एका बॉक्सरचे  अ‍ॅब्स आहेत. सर्वात धीट आणि तंदुरुस्त असा जनतेचा नेता आहे. @राहुल गांधीजी तुम्हाला खूप लांब जायचे आहे.''

वायनाडचे खासदार आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील मच्छिमारांसमवेत त्यांच्या जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी जाळी टाकली असता राहुल गांधीनी पाण्यात उडी मारली. त्यांनतर किनाऱ्यापर्यंत येईपर्यंत त्यांनी समुद्रात मनमुराद असा आनंद लुटला. राहुल समुद्रातून बाहेर आल्यानंतर त्यांचा हा फोटो घेण्यात आला होता. मात्र नेटीझन्स सोशल मिडीयावर राहुल गांधींना फिटनेस टिप्स मागत आहेत.  
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com