'सत्य अजूनही सत्य आहे',राफेल प्रकरणावरून राहुल गांधींचे सरकारवर टीकास्त्र

यापूर्वी जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी राफेल करारावर प्रश्न उपस्थित केले होते.
Rahul Gandhi slams BJP government over Rafale deal
Rahul Gandhi slams BJP government over Rafale dealDainik Gomantak

काँगेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) हे राफेल(Rafale) प्रकरणावरून नेहमीच केंद्रातील मोदी सरकारवर(Modi Government) निशाणा साधत असतात. आणि पुन्हा एकदा राफेल प्रकरणावर(Rafale Deal) हा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी हा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे . राहुल गांधींनी ट्वीट करतराफेल सौद्यात खूप भ्रष्टाचार झाला असल्याचे म्हण्टले आहे. (Rahul Gandhi slams BJP government over Rafale deal)

यावेळी केंद्रावर निशाणा साधताना त्यांनी महात्मा गांधींचे विचारही ट्विट केले आहेत हे वाचले आहे असे म्हणत - "जर आपण बरोबर आहात आणि आपल्याला ते माहित असेल तर आपले मत बोला. आपण अल्पमतात असलात तरी सत्य अजूनही सत्य आहे". 'महात्मा गांधी' असे म्हणत राफेलवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Rahul Gandhi slams BJP government over Rafale deal
Covid-19: केरळात दोन दिवस कडक संचारबंदी

राहुल गांधींनी एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत जे फ्रेंच स्वयंसेवी संस्था शेर्पाचे हवाला देऊन लिहिले गेले होते. शेर्पा स्वयंसेवी संस्थेने राफेल सौद्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या करारामध्ये आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार होता असा आरोप केला जात होता आणि ते भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात होता. शेरपा एनजीओ आधीच राफेल करारावर प्रश्न उपस्थित करत आहे.

फ्रेंच पत्रकार यान फिलीपाईन यांनी दिलेल्या अहवालात राफेल सौद्यात कथित अनियमिततेचा दावा केला आहे. या रिपोर्टनंतर शेर्पा एनजीओने तक्रार दाखल केली होती. ही स्वयंसेवी संस्था वित्त घोटाळ्याची शिकार झालेल्या लोकांना मदत करते.

यापूर्वी जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राहुल गांधी यांनी राफेल करारावर प्रश्न उपस्थित केले होते. कॉंग्रेसने राफेल जेट खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत या कराराची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) तर्फे चौकशी करण्याची मागणी केली होती. सत्य शोधण्यासाठी हाच तपास करण्याचा एकमेव मार्ग असल्याचेही काँग्रेसने सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com