'मोहन भागवत जरी विरोधात बोलले तरी मोदी त्यांना आतंकवादी ठरवतील'

दैनि्क गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी कृषी कायद्यांना विरोध कऱताना पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले, 'मोदी यांच्या विरोधात बोलणाऱ्याला आतंकवादी म्हटले जाईल मग ते मोहन भागवत जरी असले तरी'.   

नवी दिल्ली- केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात 29 दिवसांपासून पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच रोखून धरले असून दिल्लीत मात्र विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी कृषी कायद्यांना विरोध कऱताना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, 'मोदी यांच्या विरोधात बोलणाऱ्याला आतंकवादी म्हटले जाईल मग ते मोहन भागवत जरी असले तरी'.   

 राहूल गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना लोकशाहीवर प्रश्न विचारला असता त्यांनी भारतात लोकशाही राहिली नसल्याचे म्हटले आहे.  देशात कोणतीही लोकशाही नाही. ती कल्पनेत असू शकते. मात्र, वास्तवात लोकशाही अस्तित्वात नाही.  नेत्यांना तुरूंगात डांबणे या सरकारच्या काळात एक सामान्य गोष्ट झाली आहे.  

'आपल्यात एक अक्षम व्यक्ति आहे, ज्याला काहीही समजत नाही. जो केवळ तीन चार लोकांच्या हितासाठी साऱ्या देशाची यंत्रणा राबवत आहे', असा आरोप करत गांधी यांनी पंतप्रधान मोदी भांडवलदारांसाठी पैसा उपलब्ध करत असल्याचेही म्हटले. 'जो त्यांच्या विरोधात बोलेल त्याला आतंकवादी म्हटले जाईल. मग तो शेतकरी असो, मजूर असो  किंवा मग मोहन भागवत असोत', अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

कृषी कायद्यांवर बोलताना राहूल गांधी म्हणाले की, 'हे कायदे जबरदस्ती लादण्यात आले असून आम्ही राष्ट्रपतींना याबाबत निवेदन दिले आहे. यात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या विऱोधात असल्याचे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले आहे. शेतकरी या कायद्यांना विरोध करण्यासाठी पेटून उठले आहेत.' 

संबंधित बातम्या