Bharat Jodo Yatra: राहुल गांधी संतापले, 'सेल्फी काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला...', पाहा Video

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून आम्ही द्वेषाचे राजकारणाचा संपवण्याचा प्रयत्न करत आहोत.'
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' हरियाणामध्ये पोहोचली आहे. येथे पोहोचल्यावर राहुल गांधी म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून आम्ही द्वेषाचे राजकारणाचा संपवण्याचा प्रयत्न करत आहोत.' दरम्यान, राहुल गांधींच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर आलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल फोन बंद करताना दिसत आहेत. दुसरीकडे, अनेक भाजप नेत्यांनी व्हिडीओ पोस्ट करुन राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, राहुल गांधी (Rahul Gandhi) एका मंचावर दिसत आहेत, जिथे ते इतर नेत्यांसोबत फोटो क्लिक करत आहेत. तेवढ्यात एक व्यक्ती हातात मोबाईल घेऊन राहुलसोबत सेल्फी काढण्यासाठी पोहोचतो, त्यानंतर राहुल झटक्याने त्याचा मोबाईल बंद करतात. व्यासपीठावर मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते.

Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra: धास्ती कोरोनाची की काँग्रेसची? भारत जोडो यात्रा बंद करण्याचे राहुल गांधींना पत्र

दुसरीकडे, या व्हिडिओवरुन भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले की, 'राहुल गांधींनी सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे ते शिकले पाहिजे.' तर आंध्र प्रदेशचे भाजप (BJP) नेते रमेश नायडू यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हटले की, 'राहुल गांधींना काय झाले? एवढा राग का येतो त्यांना?' मात्र, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com