
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला. पुढच्या दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा राहुल यांनी खरपूस समाचार घेतला. राहुल यांनी मंगळवारी ट्विट करत म्हटले की, "8 वर्षांपूर्वी जसे तरुणांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचप्रमाणे आता 10 लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन मोदींनी पुन्हा एकदा दिले आहे.'' (Rahul Gandhi targets Narendra Modi government on 10 lakhs job promise)
दरम्यान, राहुल यांनी यापूर्वी चीनचा मुद्दा, कोरोनाला तोंड देण्यात केंद्र सरकारचे अपयश, महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे दर या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर चीनमध्ये देशाला अंधारात ठेवल्याचा आरोप केला होता.
तसेच, नॅशनल हेराल्ड प्रकरणात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या प्रकरणी राहुल यांची सोमवारी आणि आज मंगळवारी चौकशी करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.