राहुल गांधींचे केंद्र सरकारला 'पाच' गंभीर प्रश्न

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

केंद्र सरकारने विदेशातून मागवलेल्या मदतीबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट करून 5 प्रश्न उपस्थित केले आहे.

कोरोनामुळे देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ऑक्सिजन आणि औषधी अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे पाहायला मिळते आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारने विदेशातून मदत मागवली आहे. या मदतीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहे. (Rahul Gandhi's 5 serious questions to the central government on foreign aid)

ऑक्सिजनची समस्या सोडवण्यासाठी केंद्राने काय केले?: सर्वोच्च न्यायालय

केंद्र सरकारने विदेशातून मागवलेल्या मदतीबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट करून 5  प्रश्न उपस्थित केले आहे. 
1.परदेशातून भारताला आतापर्यंत कुठल्या गोष्टींची मदत मिळाली?
2. मदतीमध्ये मिळालेली सामग्री कुठे आहे?
3. त्या मदतीचा फायदा कोणाला होतोय?
4. मिळालेल्या मदतीचा राज्यांना कसा वाटप केला?
5. या सर्व गोष्टींत पारदर्शकता का नाही?

असे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारला (Central Government) धारेवर धरल्याचे पाहायला मिळते आहे. तसेच देशातील सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकार समोर कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान, देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. रोज होणारे मृत्यूचे आकडे पाहिल्यानंतर देशात मृत्यूचे तांडव सुरू असल्याचे दिसते आहे. ऑक्सिजन आणि रेमडीसीविर इंजेक्शन साठी रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळते आहे.

संबंधित बातम्या