राहुल गांधीचा मोदी सरकार व राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर हल्लाबोल

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

मोदी सरकार घटनात्मक संस्था संपवत आहे, त्यामुळे लोकांचा संसद आणि न्यायपालिकेवरील विश्वास कमी होत चालला आहे.

थुतुकोडी: केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर कॉंग्रेस राहुल गांधी  तामिळनाडूमधील थुतुकुडीमध्ये पोहचले. थुतुकुडीमधील कॉंग्रेस समर्थकांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी थुतुकुडीमधील व्हीओसी महाविद्यालयात बोलताना केंद्रातील मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला. ''मोदी सरकार घटनात्मक संस्था संपवत आहे, त्यामुळे लोकांचा संसद आणि न्यायपालिकेवरील विश्वास कमी होत चालला आहे,'' असं राहुल गांधी म्हणाले.

''मागच्य़ा सहा वर्षापासून देशाला एका सूत्रात बांधून ठेवणाऱ्या सर्व निवडक संस्था आणि फ्री प्रेसवर पध्तशीरपणे हल्ला सुरु आहे. लोकशाहीचा अंत अचानक होत नाही. ती हळूहळू संपत जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संस्थात्मक संतुलन नष्ट केले आहे,'' असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पाच राज्यातील निवडणूकीचे वाजले बिगुल; या दिवशी लागणार निकाल

तसेच ''न्यायपालिका आणि संसदेत महिला आरक्षणासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रत्येक ठिकाणी भारतीय पुरुषाने महिलांकडे एका समान दृष्टिकोनातून पाहण्याची खूप गरज आहे, जे की ते स्वत:कडे ज्या दृष्टिकोनातून पाहतात.'' असही यावेळी राहुल गांधींनी म्हटले.

 

संबंधित बातम्या