कोरोना पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा मोठा निर्णय

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

कोरोना संसर्गाचा मोठा धोका असताना देखील प्रचार सभांना होत असणाऱ्या गर्दीमुळे, राजकारणी मंडळी लोकांच्या जीविताशी खेळत असल्याची टीका होत होती.

देशात सध्या कोरोनच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होत जाताना दिसते आहे. देशातील अनेक राज्यांत रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामुळे मृत्युदर देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे. तर दुसरीकडे काही राज्यांत मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या निवडणुकांच्या प्रचार सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते आहे. कोरोना संक्रमणाचा मोठा धोका असल्याने राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल मध्ये असणाऱ्या आगामी काळातील आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.( Rahul Gandhis decision to cancel all campaign rallies in West Bengal due to corona)

देशात कोरोना  दिवसागणिक वाढत जात असताना पुन्हा मागील वर्षाप्रमाणे परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने ही लाट अतिशय गंभीर  तज्ज्ञांचे मत आहे. मात्र अशा परिस्थितीत दुसरीकडे देशात  सुरु असून, वेगेवगेळ्या पक्षांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रचार सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते आहे. कोरोना संसर्गाचा मोठा धोका असताना देखील प्रचार सभांना होत असणाऱ्या गर्दीमुळे, राजकारणी मंडळी लोकांच्या जीविताशी खेळत असल्याची टीका होत होती. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय (Decision) घटेल आहे. कोरोना संकट लक्षात घेऊन आपण पश्चिम बंगालमधील सर्व प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत, अशा वेळी प्रचार सभांमुळे देशाचे आणि जनतेचे किती नुकसान होते आहे याचा राजकीय पक्षांनी  विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election) सध्या विधान सभा निवडणूक सुरु असून विधानसभेच्या (Assembly Elections) एकूण 294 जागांसाठी एकूण 8 टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. आता पर्यंत या निवडणुकांचे 5 टप्पे  असून 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. तर 2 मी रोजी राज्यातील या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. 

संबंधित बातम्या