ईस्टर संडे निमित्त राहुल गांधींचे अनाथ मुलांसोबत जेवण; व्हिडीओ होतोय व्हायरल

दैनिक गोमंतक
रविवार, 4 एप्रिल 2021

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी राहुल गांधी केरळच्या वायनाडमधील एका अनाथाश्रमात पोहोचले आणि अनाथाश्रमातील काही लहान मुलांसोबत त्यांनी जेवण केले. लहान मुलांशी गप्पा करत पुढे त्यांनी या लहान मुलांचा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून प्रियांका गांधींशी संपर्क करून दिल्याचे पाहायला मिळते आहे. (Rahul Gandhis meal with orphans on the occasion of Easter Sunday)

Chattisgarh Naxal Attack: "जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही"

पाच राज्यांत सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांत प्रचार सभा घेताना दिसत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या केरळमध्ये प्रचार कार्यक्रमांत व्यस्त आहेत. त्यातच आज राहुल गांधी वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा येथील जीवनज्योती अनाथालयात गेले होते. 'इस्टर संडे' निमित्त त्यांनी या अनाथालयातील अनाथ मुलांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले. यावेळी जेवताना राहुल गांधी यांनी आपली बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून या मुलांचे बोलणे करून दिले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. पुढे राहुल गांधींनी वायनाड मधील तिरुनेल्ली मंदिरात पूजा सुद्धा केली असल्याचे समजते आहे. 

त्यानंतर राहुल गांधींनी मानन्थावाद्य वेल्लमुंडा येथे युडीएफद्वारे आयोजित एका सभेला ऊपस्थिती लावली असल्याचे समजते आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी "राज्यात जर युडीएफचे सरकार आले तर न्याय  योजने (Nyay Yojana) अंतर्गत गरिबांना महिन्याला 6 हजार रुपये दिले जातील." असे आश्वासन दिले आहे. दरम्यान केरळमध्ये (Kerala) येत्या 6 एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. 

संबंधित बातम्या