काँग्रेसला मिळालेल्या अपयशानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. 

देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहिर झाले आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेलं नसल्याचे पाहायला मिळाले आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. 

निवडणुकीच्या निकाल समोर आल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे पाहायला मिळते आहे. यावेळी राहुल गांधी यांनी "आम्ही नम्रपणे जनादेशाला स्वीकारतो. त्या हजारो पक्ष कार्यकर्त्यांचे आणि लाखो जनतेचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला साथ दिली. मूल्य आणि आदर्शांसाठी यापुढेही लढत राहू" अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

यापूर्वी काँग्रेस (Congress) पक्षाने देखील निवडणुकीत मिळालेले अपयश स्वीकारून आम्ही चुका सुधारण्याचा प्रयत्न करू असे मत व्यक्त केले आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी यावेळी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस हा एकमेव पर्याय असल्याचे मत  व्यक्त केले आहे.

West Bengal Results: निवडणूक जिंकवणारा "खेला होबे" हा नारा आला कुठून ?

दरम्यान, केरळ आणि आसाम मध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. तर पश्चिम बंगालमध्ये समोर आलेल्या अकड्यांवरून काँग्रेसच्या अस्तुत्वावरच प्रश्न उपस्थित होईल असे चित्र दिसते आहे.तर पुदूचेरी मध्ये देखील काँग्रेस अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे.

 

संबंधित बातम्या