काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळच्या दौऱ्यावर असताना उत्तर भारताच्या राजकारणावरून केलेल्या वक्तव्यामुळे कॉंग्रेसचा पक्ष बॅकफूटवर गेल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते स्वतःच नेमके काय ते सांगू शकतील असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आज म्हटले आहे. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींना एक प्रकारचा सल्ला देताना आपल्याला मतदारांचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. याशिवाय राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्यासाठी आपण कोणीच नसल्याचे कपिल सिब्बल यांनी आज म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी केलेले भाष्य हे कोणत्या संदर्भात आहे हे फक्त तेच सांगू शकतात, असे कपिल सिब्बल सांगितले.
अशोक दिंडा आता राजकारणात 'नशीब' आजमावणार; भाजपमध्ये केला पक्षप्रवेश
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, देशातील मतदार हे बुद्धिमान असल्याचे कपिल सिब्बल म्हटले असून, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आपण आदर केला पाहिजे. व भलेही ते देशाच्या कोणत्याही भागातील असूदेत, असे कपिल सिब्बल म्हणाले. त्यानंतर मतदार हेच आपल्याला मतदान करून सत्ता सोपवतात किंवा सत्तेवरून पायउतार करतात. त्यामुळे आपण देशातील मतदारांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचा अपमान करणे टाळले पाहिजे, असे कपिल सिब्बल यांनी पुढे सांगितले. इतकेच नाही तर, मतदार हे हुशार असून, त्यांना कोणाला मतदान करायचे आहे व कोणत्या व्यक्तीला निवडून आणायचे आहे याची पूर्ण माहिती असल्याचे कपिल सिब्बल यांनी सांगितले. तसेच मतदान कशासाठी करायचे आहे हे देखील मतदारांना माहित असल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त, काँग्रेस कधीही मतदारांचा अपमान करेल यावर विश्वास नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
जेष्ठ नागरिकांना 1 मार्चपासून मोफत कोरोना लस
यानंतर, कपिल सिब्बल यांनी एकीकडे राहुल गांधी यांना अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका देखील केली आहे. भारतीय जनता पक्ष हा काँग्रेस देशाचे विभाजन करत असलेल्या म्हणण्यावर हसू आल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले असून, भाजप सत्तेवर आल्यापासून देशातील जनतेत दुही पसरवल्याची टीका त्यांनी केली. तसेच भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून जनतेत फूट पाडण्यास सुरवात केल्याची टीका कपिल सिब्बल यांनी केली आहे. शिवाय यापूर्वी, काँग्रेस पक्षाचे आनंद शर्मा यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर बोलताना, राहुल गांधी हेच या वक्तव्याबाबत बोलू शकतील असे म्हटले होते. आणि राहुल गांधींना देशाच्या कोणत्याही भागाचा अनादर करायचा नसून, त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून भाष्य केले असावे, असे आनंद शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी हे वायनाडच्या दौऱ्यावर होते. आणि तिरुअनंतपुरम येथील सभेत बोलताना त्यांनी, यापूर्वी आपण 15 वर्षांपासून खासदार असल्याचे सांगितले. व त्यावेळी आपणाला वेगळ्या प्रकारच्या राजकारणाला तोंड द्यावे लागल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. परंतु आता केरळ मधील वायनाड मधून निवडून आल्यानंतर इथे यायला चांगले वाटत असल्याचे सांगत, इथले लोक केवळ वरवरचे नव्हे तर मुद्द्यांचे राजकारण करतात आणि विषयांच्या तळाशी जातात, असे म्हटले होते. तर भाजपने नेमका हाच धागा पकडत काँग्रेस पक्ष देशाचे विभाजन करत असल्याची टीका केली होती.