‘’केवळ लस उत्सवाचे ढोंग’’ असं म्हणत राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 एप्रिल 2021

ना चाचण्या, ना रुग्णालयात बेड, ना व्हेंटलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही, केवळ देशात उत्सवाचे ढोंग आहे.

देशभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. शिवाय रुग्णांच्या मृत्यूच्या संख्य़ेतही प्रचंड वाढ होत आहे. एकिकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी बेड्स, व्हेंटलेटर्स, ऑक्सिजनसह लस आणि इंजेक्शनचा देखील तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. लसीकरणासाठी नागरीक लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. तर, पंतप्रधान मोदींनी देशभरात 'लस महोत्सव' साजरा करण्याचे राज्यांना आवाहन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय पीएम केअर्स फंडाबाबतही काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. (Rahul Gandhi's targeting of Modi government saying only the hypocrisy of vaccination festival)

''ना चाचण्या, ना रुग्णालयात बेड, ना व्हेंटलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही, केवळ देशात उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?’’ असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

West Bengal Elections 2021: भाजपमुळेच वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

 यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. ‘’385 दिवसामध्ये कोरोनाविरुध्दची लढाई जिंकता आली नाही. उत्सव, थाळी-टाळी, खूप झालं देशाला कोरोनाची लस उपलब्ध करुन द्या..’’ असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं.

तसेच, ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही म्हणाला होतात की, कोरोनाविरुध्द लढाई 18 दिवसांमध्ये जिंकता येईल. तुम्ही जनतेकडून टाळ्या, थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाईलची लाईटदेखील लोकांना लावायला सांगितली. देशभरातील लाखो लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही मात्र इव्हेंटबाजी करत रहा, गरजू लोकांना कोरोनाची लस उपलब्ध करुन द्या. लसीची निर्यात त्वरित बंद करा आणि जे आपले गरीब बांधव आहेत त्यांना उत्तपन्नसाठी पूर्णपणे सहकार्य करा.’’  असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे.

 

 

संबंधित बातम्या