"मोदी सरकारनं देशाचं आणि सर्वसामान्यांचं बजेट बिघडवलं"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या आकाशाला भिडणाऱ्या किंमती आणि एलपीजीच्या किंमतीबद्दल  मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली:  आगामी आर्थिक वर्षाचा (2021-22) सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या आकाशाला भिडणाऱ्या किंमती आणि एलपीजीच्या किंमतीबद्दल  मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रातील मोदी सरकारने देश आणि देशातील घराचे बजेट बिघडविले आहे असा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे.  

राहुल गांधीं यांनी आज शनिवारी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मोदी सरकारने अर्थसंकल्प बिघडविला आहे. याने देश आणि घर दोन्हीचे बजेट बिघडले आहे!" याआधी शुक्रवारी काँग्रेस नेत्यांनी पुन्हा अर्थसंकल्पावर टीका केली. ते म्हणाले की, मोदींच्या 'मित्र' केंद्रित अर्थसंकल्पात - शेतकऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे द्यावे लागतील आणि त्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही. तीन कृषी कायद्यांबरोबर देशाच्या अन्नदात्याला आणखी एक धक्का दिला आहे! "

Chakka Jam: शेतकऱ्यांसह दिल्ली पोलिसही चक्का जामसाठी सज्ज -

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात पेट्रोलवर प्रतिलिटर अडीच रुपये आणि डिझेलवर चार रुपये कर लावला आहे.  दुसरीकडे, शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल सुमारे 30 पैशांनी वाढून 86.95 रुपये प्रति लीटरच्या नवीन उच्चांकावर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल  93.49 रुपये प्रतिलिटरच्या नवीन उच्चांकावर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये डिझेल प्रतिलिटर 77.13 रुपये करण्यात आले आहे. तर मुंबई ते प्रति लिटर 83.99 रुपयांवर पोहचले आहे.

 मोदी सरकार ने बजट बिगाड़ दिया-
देश और घर, दोनों का! pic.twitter.com/6GPrNwFuPm

 

 

संबंधित बातम्या