Chennai Heavy Rain: चेन्नईत पावसाने मोडला 30 वर्षांचा विक्रम

तामिळनाडुत अनेक जिल्ह्यांत शाळा, महाविद्यालये बंद; जनजीवन विस्कळीत
Rain
RainDainik Gomantak

Chennai Heavy Rain: तामिळनाडुची राजधानी चेन्नईत मुसळधार पाऊस होत असून परतीच्या या पावसाने गेल्या 30 वर्षातील विक्रम मोडला आहे. मंगळवारी चेन्नईत 8.4 सेंटीमीटर पाऊस झाला. गेल्या 30 वर्षातला हा पावसाचा उच्चांक आहे.

Rain
KTR Vs Rahul Gandhi: अमेठीचा गड राखता आला नाही, आणि चालले पंतप्रधान बनायला...

चेन्नईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील पाऊस थांबण्याचे नावच घेत नाही आहे. रात्रीपर्यंत सर्व रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सर्वच कामे ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तंजावुर, तिरुवरुर, नागपट्टिनम, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि चेंगलपेट येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. हवामान विभागाने राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी गणेशपुरम सारख्या सबवे सह अनेक भागात पाहणी केली. पुर येणाऱ्या भागात निरिक्षणासाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत.

Rain
Jimmi Jimmi Song in China: चिनमध्ये लॉकडाऊनने त्रस्त जनता गातेय मिथून-बप्पीदांचे गाणे

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मंत्रालयात याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने 5 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडूत पावसाचा इशारा दिला आहे. यात 4 नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट होता. तर काही भागात ऑरेंज अलर्टही होता. दरम्यान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पुदुच्चेरी या राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आगामी तीन दिवस पावसाचा जोर राहू शकतो. हा मान्सूनचा परतीचा पाऊस आहे.

गेल्या काही वर्षात परतीच्या पावसाने दक्षिणेकडील राज्यांना चांगलेच झोडपून काढले आहे. पावसाचा पॅटर्न बदलत चालला आहे. त्यामुळे आजकाल वर्षभर कधीही पाऊस पडू शकतो. शिवाय पावसाळा उशिरा सुरू होऊन लांबतही चालला आहे. त्याचा परिणाम एकूणच मानवी जीवनावर, शेतीवर होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com