राजस्थानात गुज्जर पुन्हा ‘रुळा’वर

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

आरक्षणाच्या मागणीसाठी गुज्जर समुदायाच्या वतीने रविवारपासून राजस्थानात ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले असून आज रेल्वे रुळावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करुन रेल्वेसेवा विस्कळीत केली.

जयपूर/ झुंझुनू  :  आरक्षणाच्या मागणीसाठी गुज्जर समुदायाच्या वतीने रविवारपासून राजस्थानात ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले असून आज रेल्वे रुळावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करुन रेल्वेसेवा विस्कळीत केली. झुंझनू जिल्ह्यातील खेतडी गावात स्थानिक युवकांनी दुपारी बाराच्या सुमारास निजामपूर वळणावर टायर पेटवून देऊन सरकारी धोरणाचा निषेध केला. त्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. दुसऱ्या बाजूने मात्र वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. 

सरकार आणि गुज्जर आरक्षण संघर्ष समिती यांच्यात सकारात्मक चर्चा न झाल्याने आजही दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच राहिले. आंदोलनादरम्यान गुज्जर समुदायातील लोकांनी पीलूपुरा येथे रेल्वेमार्गावर धरणे आंदोलन केले. अनेक ठिकाणी रुळाची हानी करून रेल्वे वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. विधानसभेतही गुज्जर आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी सरकारला या प्रश्‍नावर उत्तर मागितले.

मंत्रिमंडळाच्या उपसमितीने चर्चा करुनही आंदोलकांचे रेल्वे मार्गावर धरणे आंदोलन सुरू असल्याचे ते म्हणाले. आंदोलनामुळे अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवाही बंद केली गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.  झुंझुनू जिल्ह्यात आज स्थानिक युवकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी

संबंधित बातम्या