राजस्थानच्या महिला पत्रकार बलात्कार प्रकरणी मंत्र्याचा मुलागा अडचणीत

बलात्कार प्रकरणी राजस्थानचे काँग्रेस मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक जयपूरला पोहोचले आहे.
राजस्थानच्या महिला पत्रकार बलात्कार प्रकरणी मंत्र्याचा मुलागा अडचणीत
Rohit JoshiDainik Gomantak

राजस्थान : बलात्कार प्रकरणी राजस्थानचे काँग्रेस मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक जयपूरला पोहोचले आहे. एका 24 वर्षीय महिला पत्रकाराने रोहितविरुद्ध दिल्लीच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

(Rajasthan minister's son in trouble in rape case)

Rohit Joshi
आसाममध्ये पूरसदृश परिस्थिती, रस्ते पुल वाहून गेले, हजारो लोकं बेघर

एसीपीच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यांची टीम जयपूरला पोहोचली आहे, ही टीम आज सकाळीच रवाना झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, रोहित जोशी पोलिस ज्या घरात पहिल्यांदा पोहोचले तिथे सापडला नाही. यानंतर टीम सिव्हिल लाइनच्या वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा रोहित जोशी तेथेही आढळून आला नाही. त्यानंतर पोलीस त्याचा सतत शोध घेत आहेत.

दुसऱ्या लग्नासाठी बदलला धर्म

या महिला पत्रकाराशी त्याच्या कथित लग्नाची चर्चा काही महिन्यांपूर्वी ऐकायला मिळाली होती. रोहित आधीच विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. रोहितने या महिला पत्रकाराशी केलेल्या लग्नाच्या चर्चेतून दुसऱ्या लग्नासाठी धर्मही बदलल्याचे समोर आले.

(Crime News)

Rohit Joshi
Explainer|भारताने गव्हाच्या निर्यातीवर म्हणून घातली बंदी

मात्र, त्यानंतर या गोष्टी केवळ चर्चाच राहिल्या कारण त्यानंतर कोणताही वाद झाला नाही आणि कोणतीही बाजू पोलिसांपर्यंत पोहोचली नाही.

जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप

या महिला पत्रकाराने रोहितवर सवाई माधोपूर येथे नेऊन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय या महिलेने रोहित जोशीवर तिचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. पीडिते केलेल्या तक्रारीनुसार, ती फेसबुकच्या माध्यमातून रोहित जोशीच्या संपर्कात आली.

रोहितचे तिच्यासोबत शारीरिक संबंध होते आणि त्यानंतर ती गरोदर राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात केल्याचा आरोप तीने केला. या संपूर्ण प्रकरणाबाबत मंत्री महेश जोशी आणि त्यांचा मुलगा रोहित जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मंत्री महेश जोशी राजस्थानच्या बाहेर गेल्याची माहिती देण्यात आली.

(Rape Case)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.