राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनीसह तिचा पती आणि अन्य 6 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

चेन्नई

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या महिलेने सोमवारी रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नलिनी श्रीहरनला तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील कारागृहात ठेवण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनीसह तिचा पती आणि अन्य 6 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तामिळनाडू सरकारने 2000 मध्ये फाशीची शिक्षा बदलून आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठेवली. सोमवारी तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिला कैद्याशी तिचे भांडण झाले. तिला दुसऱ्या खोलीत ठेवण्याची मागणी तिने केली होती. यावरून तिचा आणि कारागृह अधीक्षकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर नलिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला थांबविले.
तामिळनाडूमधील श्रीपेरमबुदूरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या आत्मघाती हल्ल्यात माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.

 

 

संबंधित बातम्या