भारत- चीन सीमावादाबाबत राजनाथ सिंह यांनी दिली महत्त्वाची माहीती

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

''पॅंगॉंग  सरोवराच्या  भागातून  सैन्य  मागे  घेण्याबाबत  चीन  सरकार बरोबर  सहमती  झाली असल्याची माहिती सिंह यांना संसदेत दिली आहे.’’

नवी दिल्ली: गेल्या  अनेक  दिवसांपासून  पूर्व  लडाखमध्ये  भारत  चीन  सीमावाद  सुरु  आहे. लष्करी  पातळीवर  भारत  आणि  चीनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये अनेक  चर्चा  झाल्या  मात्र  सीमावादाच्या  मुद्द्यांवर  ठोस  पाऊले  उचलता  आले  नाहीत. तर  दुसरीकडे  केंद्रसरकारला  संसदेत  घेरत  विरोधकांनी  भारत  चीन  सीमावादावरुन  हल्लाबोल केला. मात्र केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत चीन  सीमावादाविषयी संसदेत महत्त्वाची  माहिती  दिली.‘’भारत  आपली  एक  इंचभर  सुध्दा  भूमी  कोणाला घेवू  देणार  नाही, ''पॅंगॉंग  सरोवराच्या  भागातून  सैन्य  मागे घेण्याबाबत  चीन  सरकारबरोबर  सहमती  झाली असल्याची माहिती सिंह यांना संसदेत दिली आहे.’’ पॅंगॉंग सरोवराच्या भागातील सैन्य  हा  कळीचा  मुद्दा  झाला  आहे. चीनी  सैन्य़ाने  फिंगर  फोर  पर्य़ंत  सैन्य  तैनात केल्यामुळे  भारत  चीन  सीमावाद  जास्त  चिघळला आहे.

"देशप्रेम हिच आमची विचारधारा" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

तसेच  सिंह  पुढे  म्हणाले, ''चीन  बरोबर  सैन्य  माघे  घेण्याबाबत  सतत  चर्चा  सुरु आहेत. या  चर्चेचे  फलित  म्हणून  पॅंगॉंग  सरोवरच्या  उत्तर  आणि  पूर्व  किनाऱ्यावरुन सैन्य  माघार  घेण्यावरुन  सहमती  झाली आहे. टप्प्याटप्प्याने  दोन  देशांच्या  सहमतीने तसेच  समन्वयाने  भारत- चीन  फॉरवर्ड  भागातून  सैन्य  माघार  घेणार  आहे. असे सिंह यांनी संसदेत  सांगितले.''

''भारताने  चीनने  केलेले  दावे  कधीच  मान्य  केलेले  नाहीत  तसेच  दोन्ही  बाजूंनी प्रयत्न  केले  तर  द्विपक्षीय  संबंध  योग्य  पध्दतीने  राखले  जातील. पाकिस्तानने  ज्या प्रकारे  बेकायदा  पध्दतीने  भारताची  भूमी  चीनला  देवून  टाकली  याला  भारताने कधीच  मान्यता  दिली  नाही. तर  दुसरीकडे  आता  चीनने  भारताच्या  मोठ्या भूभागावर  दावा  केला  आहे. याला  ही  भारताने  मान्यता  दिली  नाही. पूर्व  लडाखच्या भूभागात  चीनी  सैन्याने  एकतर्फी  चाल  केली आहे. परंतु भारत आपल्या  सार्वभौमत्वाचे  रक्षण  करण्यास  सक्षम आहे. चीनने  कराराचे  उल्लंघन  करत मोठ्य़ाप्रमामात सैन्य  तैनात  केले  आहे. त्यामुळे  भारताने  ही  या  वादातीत  भागात आपले  मोठी  सैन्य  तैनाती  केली  आहे.'' असेही राजनाथ सिंह  यांनी  सांगितले आहे. पॅंगॉंग  सरोवराच्या  भागातून  सैन्य  माघारीनंतर  48  तासानंतर दोन्ही  देशांच्या वरिष्ठ पातळीवरील  सैन्य  अधिकाऱ्यांची  बैठक  होईल. त्याचबरोबर अन्य  मुद्द्यावरही  तोडगा काढण्यासाठी  चर्चा  करण्यात  आहे. असेही राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगिंतले.         

संबंधित बातम्या