1962 च्या युद्धावर Rajnath Singh म्हणाले, 'पंडित नेहरुंवर टीका करु शकत नाही...'

Rajnath Singh: कारगिल विजय दिवसापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी जम्मूमध्ये पोहोचले आहेत.
Rajnath Singh
Rajnath Singh Dainik Gomantak

Kargil Victory Day: कारगिल विजय दिवसापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी जम्मूमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी 1999 च्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण केले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, "मला त्या सर्व सैनिकांची आठवण आहे, ज्यांनी देशसेवेत आपले प्राण अर्पण केले. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. 1999 च्या युद्धात ज्यांनी बलिदान दिले त्या सर्व जवानांना मी सलाम करतो.''

पं.जवाहरलाल नेहरुंचे काय?

या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) यांचा उल्लेख केला. 1962 च्या युद्धाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, '1962 मध्ये चीनने (China) लडाखमध्ये (Ladakh) आमच्या जमिनीवर कब्जा केला. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान होते. त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही. पंतप्रधानांच्या हेतूंमध्ये कोणताही दोष असू शकत नाही, परंतु हे धोरणांना लागू होत नाही. मात्र, आता भारत जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे.'

Rajnath Singh
Arvind Kejrival: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या देणार

संरक्षण मंत्री पीओकेबद्दलही म्हणाले

संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, 'आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. भारत बोलतो तेव्हा जग ऐकते. 1962 मध्ये आमचे जे नुकसान झाले त्याची आम्हाला जाणीव आहे. ते नुकसान आजपर्यंत भरुन निघालेले नाही. परंतु आता देश मजबूत आहे.' त्यांनी पीओकेबद्दल बोलताना सांगितले की, 'यासंदर्भात भारताच्या संसदेत ठराव मंजूर करण्यात आला होता. हा भाग भारताचा होता आणि भारताचाच (India) राहील. बाबा अमरनाथ आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आई शारदा सीमेपलीकडे आहे, असे होऊ शकत नाही.'

दुसरीकडे, संरक्षण मंत्री सरस्वती देवीचे मंदिर असलेल्या शारदा पीठाबद्दल बोलत होते. हे पीओकेमधील मुझफ्फराबादपासून 150 किमी अंतरावर नीलम व्हॅलीमध्ये आहे. काश्मिरी पंडितांसाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. काश्मिरी पंडितांची मागणी आहे की, करतारपूरप्रमाणे इथेही कॉरिडॉर बनवावा जेणेकरुन शारदा पीठ पाहता येईल.

Rajnath Singh
'अरविंद केजरीवाल यांना पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे आहे पण...' : चरणजीत सिंग चन्नी

यावेळी, भारतीय सैन्य 23 वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. हा दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जातो आणि शहीदांचे स्मरण केले जाते. कारगिलमध्ये तीन दिवसीय कार्यक्रमाची तयारी सुरु आहे. यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून ज्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com