''चहावाला म्हणून म्हणत खिल्ली उडवणारेच आता, चहाच्या मळ्यांमध्ये दिसत आहेत''  

दैनिक गोमंतक
मंगळवार, 23 मार्च 2021

देशातील आसाम, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरी या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.

देशातील आसाम(Asam) , तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरी या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यातील बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस(Congress) मध्ये मुख्य लढत असल्याचे चित्र दिसते आहे. त्यातच आता, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आसाममध्ये प्रचारादरम्यान काँग्रेसवर टीका करत जोरदार हल्ला चढवला आहे. होजई जिल्ह्यात प्रचार सभेला संबोधित करत असताना, 'ज्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चायवाला' असे म्हणून त्यांची चेष्टा केली आता तेच लोक चहाची पान तोडताना दिसत आहेत,' असा घणाघात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर केला.(Rajnath Singh said People who used to make fun of tea is now seen in tea farms)

होजई जिल्ह्यातील लुमडिंग येथील प्रचार सभेला संबोधित करताना, पूर्वी आमच्या पंतप्रधानांना 'चायवाला' असे संबोधून त्यांची चेष्टा केली जात होती. मात्र आता तेच लोक चहाची पाने विकताना आणि तोडताना दिसत आहेत. आज खऱ्या चाहावाल्याने अर्थात नरेंद्र मोदींमुळे त्यांना इथे चहाच्या बागेत यावे लागले  आहे तरी तुम्ही सावध राहा, कारण खरा चहावाला मात्र फक्त आमच्याकडेच आहे,'' असे म्हणत राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी प्रामुख्याने चहाची शेती करणाऱ्या असामी नागरिकांना भावनिक आवाहन केले. 

अलीकडेच कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी मतदान आसाम मधील काही केंद्राना भेट दिली होती. तसेच बिस्नाथ जिल्ह्यातील चहा बागेत चहा कामगारांसोबत साडी नेसून पाठीवर टोपली घेऊन चहाची पाने तोडताना दिसल्या होत्या. तसेच, कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनीही नुकत्याच झालेल्या आसाम दौऱ्यात जर आसाम मध्ये काँग्रेसची सत्ता आली तर, चहा कामगारांना 365 रुपये रोज वेतन देऊ, असे आश्वासन दिले होते. भारतीय जनता पक्षाने पूर्वी चहा कामगारांना असेच आश्वासन दिले होते पण त्यांचे ते आश्वासन खोटे ठरले, असेही राहुल गांधी पुढे म्हणाले. 

 ''काँग्रेस ही कमकुवत झाली असून त्यांनी घरी बसून चालणार नाही'...

आसाममध्ये  तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील 47 जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात 13 जिल्ह्यातील 39 जागांसाठी 1 एप्रिल रोजी मतदान होईल, तर तिसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यांतील 40 विधानसभा मतदारसंघात 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहेत. तर या सर्व निवडणुकांचे निकाल 2 मे  रोजी जहीर होणार आहेत.(Rajnath Singh said People who used to make fun of tea is now seen in tea farms)

संबंधित बातम्या