राज्यसभा: भल्या भल्यांना ठसका लावणाऱ्या मिर्चीला येणार का अच्छे दिन?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

 मिर्ची उतपादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय मिरचीची वाढती मागणी लक्षात घेता राष्ट्रीय मिर्ची अनुसंधान संशोधन केंद्र स्थापन केले जावे. 

नवी दिल्ली: आज गुरुवारी राज्यसभेत भाजपच्या एका सदस्याने भारतीय मिर्चीच्या संशोधनासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन इंडियन ची मागणी केली. भाजपच्या जी.व्ही.एल. नरसिंह राव यांनी झिरो अवर दरम्यान हा मुद्दा उपस्थित केला आणि ते म्हणाले की, "भारत हा जगातील सर्वात मोठा मिरची उत्पादिन करणारा देश आहे. जगाच्या तुलनेत जवळजवळ 40 टक्के मिरची ही भारतात उत्पादित केली जाते. इतकेच नव्हे तर संपूर्ण जगभरात भारतातून मिरचीची निर्यात 50 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत मिर्चीच्या निर्यातीत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे."

गेल्या काही वर्षांत मिरचीचे उत्पादनही वाढले आहे. त्याचबरोबर सरकार नगदी पिकांनाही प्रोत्साहन देत आहे. मिर्ची उतपादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय मिरचीची वाढती मागणी लक्षात घेता राष्ट्रीय मिर्ची अनुसंधान संशोधन केंद्र स्थापन केले जावे. अशी मागणी राव यांनी केली आहे.

झिरो अवरमध्ये भाजपचे डॉ डीपी वत्स यांनी युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांच्या विधवांना सैन्यात नोकरी देण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की अशा महिलांना सैन्यात थेट भरती करण्याची तरतूद आहे. काही महिला आवश्यक पात्रता, औपचारिकता, प्रशिक्षण पूर्ण करतात आणि त्यासाठी प्रवेश घेतात. तर कधीकधी काहींना सैन्यात रिक्त पद नसल्याने ही संधी मिळत नाही. यासाठी सैन्यात रिक्त पदे वाढवण्याची मागणी वत्स यांनी सरकारकडे केली आहे.

ट्विटरने सरकारचा आदेश मान्य न केल्यास,अधिकाऱ्यांना अटकदेखील होऊ शकते -

संबंधित बातम्या