
आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांपैकी पाच जागांचं चित्र स्पष्ट असलं तरी सहाव्या जागेकडे म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यातील लढत रंगल्याचं चित्र आहे. या निवडणूकीत आज मतदानाची प्रक्रिया 3.30 च्या दरम्यानच पूर्ण झाली. एकूण 285 आमदारांनी मतदान केलं.(Rajya Sabha elections: One hour delay in counting of votes possible )
यावेळी बोलताना राज्यसभा उमेदवार संजय पवार विजयी होतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. यातच आता भाजपने भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. यामूळे राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणीला एक तासाचा विलंब होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची तीन मते अवैध ठरवावीत अशी तक्रार भाजपने केली होती. या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. आज एकूण 285 आमदारांनी मतदान केलं. चार वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार होती. दरम्यान, भाजपकडून या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे अवैध ठरवावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहीत तशी तक्रार घेतली. त्यामुळे सध्यातरी मतमोजणीची प्रक्रिया रखडली असून अजून त्याला एक तासाचा विलंब होणार असल्याची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.