Rajya Sabha Elections: कर्नाटकात भाजपची सरशी, कॉंग्रेसने जिंकली 1 जागा

कर्नाटकात भाजपने 3 जागा जिंकल्या असून कॉंग्रेसने 1 जागा जिंकली आहे.
Karnataka
KarnatakaDainik Gomantak

Rajya Sabha Election Result 2022: कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागांचा निकाल सत्ताधारी भाजपसाठी अधिक बळ देणारा ठरला आहे. राज्यातील चारपैकी तीन जागा पक्षाने जिंकल्या आहेत, तर एक जागा काँग्रेसकडे गेली आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. जिथे भाजपचे उमेदवार निर्मला सीतारामन, जगेश आणि सीटी रवी विजयी झाले आहेत, तर जयराम रमेश यांच्या रुपाने काँग्रेसला केवळ जागा मिळवता आली.

दरम्यान, कर्नाटकातील (Karnataka) चार जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत जनता दल (सेक्युलर) चे दोन आमदार- श्रीनिवास गौडा आणि श्रीनिवास गुब्बी यांनी पक्षाविरोधात मतदान करत काँग्रेसला मतदान केले. क्रॉस व्होटिंग जेडीएससाठी निराशाजनक ठरले कारण चारपैकी एका जागेवर काँग्रेस आणि जेडीएस या दोन प्रमुख विरोधी पक्षांमध्ये चुरस होती. याचे कारण विचारले असता ते म्हणाले, "कारण माझे काँग्रेसवर (Congress) प्रेम आहे." श्रीनिवास यांनी यापूर्वीच एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

Karnataka
Rajya Sabha Elections: राजस्थानात काँग्रेसचा बोलबाला,भाजपच्या खात्यात एक जागा

तसेच, जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी नंतर पुष्टी केली की, पक्षाच्या 32 पैकी दोन आमदारांनी क्रॉस व्होट केले आहे. महत्त्वाचं म्हणजे, निवडणुकीच्या एक दिवस आधी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जेडीएस आमदारांना (MLA) एक खुले पत्र लिहून पक्षाचे उमेदवार मन्सूर अली खान यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांचा विजय हा दोन्ही पक्षांच्या ‘धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा’ विजय असेल, असे या पत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com