Rajya Sabha Nomination: पीटी उषा अन् इलैया राजा यांची राज्यसभेवर निवड

पीटी उषा आणि इलैया राजा यांची राज्यसभेवर निवड करण्यात आले आहे.
PT Usha
PT UshaDainik Gomantak

Rajya Sabha Nomination: केंद्र सरकारने पीटी उषा आणि इलैया राजा यांच्यासह चार जणांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. केंद्राने नामनिर्देशित केलेल्या नावांमध्ये पीटी उषा, इलैया राजा, वीरेंद्र हेगडे आणि केव्ही विजयेंद्र प्रसाद यांचा समावेश आहे. पीएम मोदींनी पीटी उषा, इलैया राजा, वीरेंद्र हेगडे आणि केव्ही विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या नामनिर्देशित सदस्यांची राष्ट्रपती कोट्यातून निवड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार नामनिर्देशित सदस्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम केले आहे. हे चारही नामनिर्देशित सदस्य दक्षिण भारतातील (South India) विविध राज्यांतील आहेत.

PT Usha
Rajya Sabha Elections 2022: 4 राज्ये 16 जागा! भाजपचा डाव अन् मविआची लढत

दुसरीकडे, विजयेंद्र प्रसाद बाहुबलीचे लेखक आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील आहेत. त्यांनी RRR, सलमान खानचा (Salman Khan) बजरंगी भाईजान, मणिकर्णिका, थलैवी यांसारख्या चित्रपटांचे स्क्रीन रायटिंग केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com