राज्यसभा: पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर; राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला दिला निरोप

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा राज्यसभएचा कार्यकाळ संपला आहे. सभागृहात गुलाम नबी आझाद यांच्या योगदानाचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. पंतप्रधान इतके भावनिक झाले की त्यांनी बोलणे बंद केले. त्यांनी आपले अश्रू पुसले.

राज्यसभा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा राज्यसभएचा कार्यकाळ संपला आहे. कार्यकाळ सांभाळणाऱ्या खासदारांमध्ये दोन पीडीपी, एक कॉंग्रेस आणि एक भाजपाच्या खासदारांचा समावेश आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी पुन्हा एकदा राज्यसभेत भाषण केले. आपल्या भाषणा दरम्यान पंतप्रधानांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले. दरम्यान एका दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना पंतप्रधान भावूक झाले. त्यावेळी गुलाम नबी आझाद अडकलेल्या लोकांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे चिंता कशी करतात हे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांनी त्यांना त्यावेळी मदत केली होती. 

आतंकवादी घटनेचा संदर्भ देतांना भावुक झाले मोदीजी

गुलाम नबीचे कौतुक करीत दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "गुलाम नबी जी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आम्ही खूप जवळ होतो. एकदा गुजरातमधील काही प्रवाशांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा त्यात 8 लोक मरण पावले होते. मला सर्वात प्रथम गुलाम नबीजींचा फोन आला होता. त्याचे अश्रू थांबत नव्हते. गुलाम नबी जी या घटनेवर सतत नजर ठेवून होते. त्यांना त्या प्रवाशांविषयी असे वाटत होते की, जणू ते त्याच्या कुटूंबाचे सदस्य आहेत. मी आझाद आणि प्रणव मुखर्जी यांचे प्रयत्न मी कधीही विसरणार नाही. प्रणव मुखर्जी त्यावेळी संरक्षणमंत्री होते. मी त्यांना सांगितले की सैन्याच्या विमानाने मृतदेह आणण्यासाठी मदत होईल, तर  काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था करतो असे त्यांनी म्हटले होते. गुलाम नबी जी त्या रात्री विमानतळावर होते."

सभागृहात गुलाम नबी आझाद यांच्या योगदानाचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. पंतप्रधान इतके भावनिक झाले की त्यांनी बोलणे बंद केले. त्यांनी आपले अश्रू पुसले आणि पाणी प्यायले आणि सॉरी म्हणत  आपल्या भाषणाला पुन्हा सुरवात केली.

गुलाम नबीकडून परिस्थिती कशी हाताळली जाते हे शिकून घ्यावे

राज्यसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, सत्ता येते आणि जाते सत्ता कशी हाताळायची हे गुलाम नबी आझाद जी कडून शिकले पाहिजे. मी त्यांना एक खरा मित्र मानतो. पंतप्रधान म्हणाले की बऱ्याच लोकांना त्याच्या या उत्साहाविषयी माहिती नाही. ते एक बागवानी आहेत.

पाकिस्तानमधील हिंदू मंदिरांना अवकळा; पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा -

गुलाम नबी यांना पार्टी, देश आणि सभागृहाची चिंता 

पंतप्रधान म्हणाले की, "मला भीती वाटते की गुलाम नबीजी नंतर जो कोणी हाा पदभार स्वीकारेल त्याला गुलाम नबीजी सारख काम करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कारण गुलाम नबीजी यांना त्यांच्या पक्षाबद्दल चिंता वाटत होती. त्याचबरोबर देश आणि सदनाबद्दल ही त्यांना तितकीच चिंता होती. श्री गुलाम नबी आझाद यांनी खासदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून उच्च स्थान मिळविले आहे. त्यांचे हे कार्य खासदारांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. मी माझ्या अनुभवांवरून आणि परिस्थितीवरून गुलाम नबी आझाद यांचा आदर करतो."

Delhi Tractor Parade Violence: दिप सिध्दूच्या मदतीला धावून आली कॅनडाची मैत्रिण -

पंतप्रधानांनी खासदारांचे आभार मानले

पंतप्रधान म्हणाले, "श्री गुलाम नबी आझाद जी, श्री शमशेरसिंह जी, मीर मोहम्मद फयाज जी,  नादिर अहमद जी,  मी तुम्हा सर्वांनी ह्या सदनाची शोभा वाढविली, आपले अनुभव, आपले ज्ञान देशाच्या फायद्यासाठी आणि प्रांताच्या समस्या सोडविण्यासाठी वापरले आपण सर्वांनी दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल मी आपले आभार मानतो."

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

संबंधित बातम्या