हल्याळ येथे इंधन दरवाढीविरोधात फेरी

Dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

हल्याळ तालुका गट काँग्रेस समिती आणि  हल्याळ तालुका युवा काँग्रेसच्या वतीने शहरात फेरी काढण्यात आली. 

हल्याळ

 केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या केेलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ हल्याळ तालुका गट काँग्रेस समिती आणि  हल्याळ तालुका युवा काँग्रेसच्या वतीने शहरात फेरी काढण्यात आली. विधानपरिषद सदस्य एस .एल. घोटणेकर आणि  हल्याळ-दांडेली-जोयडा युवा काँग्रेस समिती अध्यक्ष रवी तोरनगट्टी यांनी तहसीलदार विद्याधर गुळगुळी यांना  या दरवाढीविरोधातील निवेदन सादर केले. राष्ट्रपतींना उ्द्देशून हे निवेदन त्यांनी लिहिले आहे.
घोटणेकर यावेळी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने कोविड टाळेबंदी असताना इंधनावरील करवाढीसंदर्भात पाऊल निराशादायक आहे. भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस  दरात वाढ करून  सध्याच्या कठीण परिस्थितीत कष्टप्रद जीवन जगणाऱ्यांना आणखीन त्रास दिला आहे. शेतकरी, मजूर, व्यापारी वर्गावर सरकारने केलेला हा अन्यायच आहे. केंद्र सरकारने येत्या दिवसात  ही दरवाढ कमी न केल्यास सर्वसामान्यांना  जगणे  कठीण होणार आहे.  सरकारने पुढाकार घेऊन पेट्रोल डिझेल दर लवकरात लवकर कमी करून  जनतेला आनंदीमय जीवन जगण्यास द्यावे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष  श्रीनिवास घोटणेकर, नगरसेवक अनिल चव्हाण, नवीन काटकर,  मोहन मेलगि, द्रौपदी अगसर, नुसरतजहा बस्सापूर, शमीनाबानू जांबुवाले, अशोक घोटणेकर,जाकीर लतिफनवर बाबू मिराशी,  युवा नेते  सुंदर मादार, रोहन ब्रेगेन्झा, अब्दुल सलाम, यशवंत पट्टेकर व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

संबंधित बातम्या