'या' कारणासाठी गुरमीत राम रहीम तुरूंगातून बाहेर...

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 21 मे 2021

बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा (Dera Saccha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीमला पॅरोल मिळाला आहे.

दोन महिलांवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा (Dera Saccha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीमला आजारी आईला भेटसाठी पॅरोल मिळाला आहे. शुक्रवारी जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून (Jail Authority) ही माहिती मिळाली आहे. परंतु, गुरमीत राम रहीमला (Gurmit Ram Rahim) किती दिवस तुरूंगातून सोडण्यात येणार ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली  आहे. (Ram rahim singh granted parole )

"तुरूंगातील प्रत्येक कैद्याला पॅरोल घेण्याचा अधिकार आहे. प्रशासन आणि पोलिसांकडून अभिप्राय मिळाल्यानंतर राम रहीमला सोडण्यात येते. गेल्या वर्षीही राम रहिमला एक दिवसाची पॅरोल देण्यात अली होती," अशी माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम रहीमने चार दिवस पॅरोलची मागणी केली होती.

ब्लॅक फंगस पेक्षा व्हाईट फंगस अधिक जीवघेणा? वाचा सविस्तर 

काही दिवसांपूर्वी गुरमीत राम रहीमबद्दल एक बातमी समोर आली होती. त्यानुसार राम रहिमला श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच रुग्णालयात तिने डॉक्टरांना कोरोना तपासणी करण्यास नकार दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुरमीत राम रहीम या तथाकथिक संतावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर देशभरात मोठे वादंग पेटले होते. त्यानंतर त्यांच्यावरचे हे आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यालयाकडून त्यांना 20 वर्षाची शिक्ष सुनावण्यात आली असून राम रहीम सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 

संबंधित बातम्या