ऐन बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामविलास यांची प्रकृती खालावली

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

काही दिवसानंतर बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. याकाळात रामविलास पासवान यांची तब्येत बिघडल्याने पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण रामविलास पासवान हे जनशक्ती पार्टीचे प्रमुख नेते आहेत.

पटना- केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या रामविलास पासवान यांची अचानक तब्येत खालावल्याने शनिवारी दिल्लीत त्यांची हार्ट सर्जरी केली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. काल एकदम त्यांची तब्येत खूपच बिघडल्याने चिराग पासवान संसदीय बैठक सोडून गेले होते. 

शनिवारी रात्री उशिरा रामविलास पासवान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. याबद्दलची माहिती चिराग पासवान यांनी रविवारी सकाळी ट्विट करुन दिली. यामध्ये चिरागने लिहले आहे की, "मागील काही दिवसांपासून बाबांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने रात्री उशिरा ऑपरेशन करावे लागले. गरज पडली तर काही आठवड्यांनी अजून एक ऑपरेशन करावे लागण्याची शक्यता आहे. संकटाच्यावेळी आपण सर्वजण माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे राहिल्याबद्दल सर्वांचे आभार."

काही दिवसानंतर बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. याकाळात रामविलास पासवान यांची तब्येत बिघडल्याने पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण रामविलास पासवान हे जनशक्ती पार्टीचे प्रमुख नेते आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्याबाजूला एनडीएमध्ये जागावाटपावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. 

संबंधित बातम्या