Crime: 'रोज 10-15 लोक बलात्कार करायचे', 14 वर्षीय रिसेप्शनिस्टने सांगितली आपबीती

Crime News: पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महिला पोलिस स्टेशन पूर्व येथे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Crime News: मिलेनियम सिटी येथील एका मॉलमध्ये असलेल्या स्पा सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मारहाण आणि ब्लॅकमेल केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बुधवारी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, ही अल्पवयीन मुलगी दिल्लीची (Delhi) रहिवासी आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, 'ऑगस्टमध्ये मी एका तरुणीच्या संपर्कात आले होते. तिच्या माध्यमातून सोहना रोडवरील एका मॉलमधील स्पा सेंटरमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली.' स्पा सेंटरमध्ये पहिल्याच दिवशी मसाजसाठी आलेल्या तरुणासह पीडितेला जबरदस्तीने खोलीत जाण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र मुलीने नकार दिल्यानंतर आरोपीने हे काम तुलाच करावे लागेल असे सांगितले. अशा स्थितीत मुलगी खोलीत गेली आणि काही वेळाने बाहेर आली. बाहेर येताच तिने उद्यापासून कामावर येणार नसल्याचे सांगितले.

Crime News
Lalu Prasad Yadav उपचारासाठी सिंगापूरला जाणार, पासपोर्ट जारी करण्याचे कोर्टाचे आदेश

दुसरीकडे, स्पा सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या तरुणाने तिला तिचा अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच न आल्यास व्हायरल करण्याची धमकीही त्याने तिला दिली. भीतीमुळे ती आणखी पाच ते सहा दिवस स्पा सेंटरमध्येच राहिली. यादरम्यान मुलीने आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. तसेच प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही तिने सांगितले. दररोज 10-15 लोक तिच्यावर बलात्कार करायचे.

Crime News
Lalu Yadav News: पंतप्रधान मोदींनी केली लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस

तसेच, पोलिसांच्या चौकशीत मुलीने खुलासा केला की, 'सहा दिवसांनी माझे कुटुंबीय येऊन मला स्पा सेंटरमधून घेऊन गेले.' हा संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम कुटुंबीयांना सांगितला, त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. तपास सुरु झाला आहे. तपासात समोर आलेल्या तथ्याच्या आधारे कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी (Police) म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com