फक्त एक किलो चहा 75000 रूपयांचा...!

फक्त एक किलो चहा 75000 रूपयांचा...!
assam tea sells for 75000 rs

नवी दिल्ली-गुरूवारी गुवाहाटीच्या टी ऑक्शन सेंटरने (GTAC) मनोहारी गोल्ड स्पेशलिटी चहाला तब्बल 75 हजार रुपये प्रति किलो ग्रॅमला विक्री केली आहे. यावर्षीची स्पेशालिटी चहाची ही किंमत सर्वाधिक ठरल्याची माहिती आधिकाऱ्यांनी दिली आहे. एक वर्षाच्या गॅपनंतर जीटीएसीने मनोहारीचा चहा 75 हजारांपेक्षा जास्तीने विकला गेला आहे. गुवाहाटी टी ऑक्शन बायर्स एसोसिएशन (GTABA) सचिव दिनेश बिहानी यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.

सचिव बिहानी यांनी अधिकची माहिती देताना सांगितले की, या चहाला विक्रमी किंमतीत विष्ण टी कंपनीने खरेदी केलं आहे. आता ही कंपनी या चहाला त्यांच्या ई-कॉमर्स वेबसाइटवरद्वारे विक्री करणार आहे. पुढे बोलताना बिहानी यांनी सांगितले की कोरोना महामारीच्या काळात चहा बाजारपेठेसाठी हा खूप मोठा सकारात्मक संदेश आहे. मनोहरी टी स्टेटने या चहाच्या उत्पादनासाठी खास उपययोजना केल्या होत्या. 

मागील वर्षी कमी होती किंमत 

2019मध्ये 50 हजार रुपयाला विकला गेला होता हा चहा-
मागील वर्षी या चहाची विक्री 50 हजार रुपये प्रति किलोंनी झाली होती. आसामच्या चहाची विशेषतः संपुर्ण जगभर प्रसिध्द आहे. या चहाची चव, सुगंध आणि कलर खूपच मनमोहक असतो. भारतात सर्वात जास्त चहाचे उत्पादन आसाम राज्यातच होतं. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com