सिद्धू म्हणतात इम्रान खान 'लहान भाऊ'; खासदार रवी किशनने घेरलं

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील नवज्योतसिंग सिद्धू यांना त्यांच्या "मोठा भाऊ" टिप्पणीसाठी फटकारत सिद्धूचे हे पहिले विधान नाही असे सांगत
सिद्धू म्हणतात इम्रान खान 'लहान भाऊ'; खासदार रवी किशनने घेरलं
Ravi Kishan slams to Navjot Singh Sidhu on his statement on Imran KhanDainik Gomantak

नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी 'बिग ब्रदर' या पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर (Pakistan Prime Minister) केलेल्या टिप्पणीला उत्तर देताना भाजपचे खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी एक विधान केले आहे आणि त्यांचे हे विधान अधिकच चर्चेत आहे. पीसीसी प्रमुखांनी तात्काळ इम्रान खान (Imran Khan) यांना भारतात दहशतवादी पाठवणे थांबवण्याची विनंती करावी,तसेच किशन पुढे म्हणाले की, 'लहान भाऊ' म्हणून सिद्धू इम्रान खानला भारतात ड्रग्ज विकू नका असे सांगू शकतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Ravi Kishan slams to Navjot Singh Sidhu on his statement on Imran Khan)

रवी किशन म्हणाले, मी सिद्धूला विनंती करतो की त्यांनी आपल्या मोठ्या भावाला भारतात ड्रग्सची विक्री थांबवण्यास सांगावे. तसेच त्यांनी इम्रान खान यांना भारतात दहशतवादी पाठवणे थांबवायला हवे. या बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी सिद्धूने आपल्या मोठ्या भावाला यशस्वीपणे पटवून दिल्यास, इम्रान खान हे सिद्धूचे मोठे भाऊ आहेत हे सर्वजण मान्य करतील, असे भाजप खासदार रवी किशन यांनी सांगितले आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील नवज्योतसिंग सिद्धू यांना त्यांच्या "मोठा भाऊ" टिप्पणीसाठी फटकारत सिद्धूचे हे पहिले विधान नाही असे सांगतच त्यांनी यायाधीहि 'माझा मित्र, दिलदार' म्हणत सिद्धूनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांची गळाभेट घेतली होती. दक्षिण भारतातील राज्यांबाबत सिद्धूच्या वक्तव्याचा संदर्भ देत संबित पात्रा म्हणाले, मी दक्षिण भारतीयांना आठवण करून देऊ इच्छितो की सिद्धू यांनी यापूर्वी जे सांगितले होते, त्यांनी दक्षिण भारतापेक्षा पाकिस्तानला प्राधान्य दिले होते आणि ते दक्षिण भारताचे नेते असल्याचे सांगितले होते. तुलनात्मकदृष्ट्या समजून घ्या. पाकिस्तानचे खाद्यपदार्थ आणि भाषा उत्तम. दक्षिण भारताची पाकिस्तानशी तुलना करण्याचे धाडस कसे झाले असा सवालसंबित पात्रा यांनी केला आहे.

Ravi Kishan slams to Navjot Singh Sidhu on his statement on Imran Khan
आमच्या हद्दीत घुसाल तर याद राखा, राजनाथ सिंहांचा चीन पाकिस्तानला इशारा

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले की, भारतीय भूमीवर दहशतवादी पाठवून आमच्या सैनिकांवर हल्ले करून पाकिस्तानचे पंतप्रधान कधीही भारताचे मोठे भाऊ होऊ शकत नाहीत. याआधी शनिवारी नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानातील करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देण्यासाठी पोहोचले होते. तेथे त्यांनी इम्रान खान यांना त्यांच्या स्वागताच्या निमित्ताने मोठा भाऊ असा उल्लेख केला होता.

सिद्धू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रयत्नांमुळे कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा उघडणे शक्य झाले आहे. त्यांनी नंतर वादग्रस्त विधान फेटाळून लावले आणि म्हणाले, जेव्हा पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जातात तेव्हा ते 'देशप्रेमी' असतात, जेव्हा सिद्धू जातात तेव्हा ते 'राष्ट्रवादी' असतात हे चुकीचं होत असल्याचे नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com