''राहुल गांधी पार्ट टाइम राजकारण आणि परदेशी कंपन्यांसाठी फुल टाइम लॉबिंग करतात''  

शुक्रवार, 9 एप्रिल 2021

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांच्यावर आज जोरदार हल्ला चढविला आहे.

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांच्यावर आज जोरदार हल्ला चढविला आहे. रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते पार्ट टाइम राजकारणात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. तसेच रविशंकर प्रसाद यांनी पार्ट टाइम राजकारणात राहुल गांधी अपयशी ठरल्यानंतर आत ते फुल टाइम लॉबींग करण्यात मग्न असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी हे भारतात विदेशी फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या कोरोना लसीची मंजुरी मिळवण्यासाठी पूर्ण वेळ लॉबींग करत असल्याची जहरी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. (Ravi Shankar Prasad has strongly criticized Rahul Gandhi)

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर शेतकरी रस्ते रिकामे करतील?

त्यासोबतच, रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांनी राहुल गांधींनी यापूर्वी लढाऊ विमान तयार करणार्‍या परदेशी कंपन्यांसाठी लॉबिंग केल्याचे सांगितले. आणि आता राहुल गांधी हे कोरोना लसी तयार करणाऱ्या परदेशी फार्मा कंपन्यांसाठी फुल टाइम लॉबिंग करत असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. त्यामुळे देशातील लसीच्या मुद्द्यावरून आता देशातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, भारत सध्याच्या घडीला लसीच्या कमतरतेचा सामना करत नसून मात्र राहुल गांधी यांची उपासमार होत असल्याचे म्हटले आहे. 

हिंदू कुटुंबाने केले मुस्लिम महिलेवर अंत्यसंस्कार 

याशिवाय, रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आतापर्यंत लस का घेतली नाही? असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला आहे. तसेच हे निरीक्षण असून कदाचित राहुल गांधी यांना लस नको आहे का? किंवा आपल्या परदेशी दौऱ्यांप्रमाणे राहुल गांधींना याचा खुलासा करायचा नसल्याचे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. यानंतर कॉंग्रेस शासित राज्यांमध्ये लसींची कमतरता नसून आरोग्य सेवेबाबत मूलभूत वचनबद्धतेची असल्याचे आणि राहुल गांधींना हे माहित असणे गरजेचे असल्याचे मत रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर, राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षातील सरकारला त्यांचे वासुली उपक्रम थांबविण्यासाठी सांगून लसींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.    

दरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीची निर्यात त्वरित थांबवावी अशी मागणी केली होती. याशिवाय, राहुल गांधी यांनी नियम व कायद्यांनुसार इतर लसींना लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी, असे देखील आपल्या पत्रात म्हटले होते. आणि त्यामुळे ज्यांना लसीची आवश्यकता असेल त्यांना लस कमी कालावधीत उपलब्ध होऊ शकणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने सध्याच्या 35,000 कोटी रुपयांच्या लसीची खरेदी दुप्पट करावी आणि लस खरेदी व वितरणात राज्य सरकारची भूमिका व वाटा वाढवावा असे राहुल गांधी यांनी पत्रातून पंतप्रधानांना सांगितले होते.       

 

संबंधित बातम्या