Ravish Kumar: रवीश कुमार यांनी NDTV च्या कार्यकारी संपादक पदाचा दिला राजीनामा

Ravish Kumar: एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे.
Ravish Kumar
Ravish KumarDainik Gomantak

Ravish Kumar: एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. NDTV (हिंदी) चा सुप्रसिद्ध चेहरा रवीश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात हम लोग, रवीश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाइमसह अनेक कार्यक्रम आयोजित केले. रवीश कुमार यांना दोनदा पत्रकारितेतील योगदानाबद्दल रामनाथ गोएंका पुरस्कार आणि 2019 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, रवीश यांच्या राजीनाम्यानंतर, एनडीटीव्ही ग्रुपच्या अध्यक्षा सुपर्णा सिंग म्हणाल्या की, 'रवीश हा अनेक दशकांपासून एनडीटीव्हीचा अविभाज्य भाग आहे. त्याचे योगदान खूप मोठे आहे. आम्हाला विश्वास आहे की, तो त्याच्या नवीन इनिंगमध्ये देखील सफल होईल.'

Ravish Kumar
Adani NDTV Offer: अदानी ग्रुपची ओपन ऑफर, NDTV चे आणखी शेअर्स करणार खरेदी

दुसरीकडे, रवीश कुमार यांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा एनडीटीव्हीचे कार्यकारी सह-अध्यक्ष प्रणव रॉय यांनी एक दिवस आधी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. अनेक दिवसांपासून रवीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, बुधवारी त्यांनी अधिकृतपणे मेल पाठवून राजीनामा सादर केला आहे.

NDTV अदानीला कसे विकले?

रॉय दाम्पत्याने 2009 मध्ये रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजशी निगडीत कंपनीकडून 400 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले होते. ही कंपनी विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) होती. या कर्जाच्या बदल्यात, व्हीसीपीएलला वॉरंटचे आरआरपीआर होल्डिंग्जच्या शेअर्समध्ये रुपांतर करण्याचा अधिकार मिळाला. RRPR होल्डिंग्सचा NDTV मध्ये 29.2 टक्के हिस्सा आहे.

Ravish Kumar
NDTV Share Price Today: एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये सलग पाचव्या दिवशी उसळी

दुसरीकडे, अदानी समूहाने (Adani Group) ऑगस्टमध्ये व्हीसीपीएल स्वतः विकत घेतले होते. त्यानंतर वॉरंटचे शेअर्समध्ये रुपांतर करण्याबाबतही सांगण्यात आले होते. मात्र, एनडीटीव्हीच्या प्रवर्तकांनी सुरुवातीला या निर्णयाला विरोध केला होता की, ते आपल्याशी चर्चा करत नाहीत. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी त्यासाठी परवानगी दिली. यामुळे VCPL ला RRPR होल्डिंगमध्ये 99.5 टक्के हिस्सा मिळाला.

तसेच, RRPR (राधिका रॉय प्रणॉय रॉय होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड) अजूनही प्रवर्तक आहे. न्यूज चॅनलमध्ये त्यांची 29.18 टक्के हिस्सेदारी आहे. तर एनडीटीव्हीमध्ये प्रणय रॉय 15.94 टक्के आणि राधिका रॉय 16.32 टक्के (एकूण 32.26 टक्के) आहेत.

Ravish Kumar
NDTV-Adani: थकित कर्जामुळे अदानीला NDTVचा ताबा घेण्याची संधी

व्हीसीपीएलच्या अधिग्रहणानंतर, अदानी समूहाने एनडीटीव्हीमधील 26 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची खुली ऑफर दिली आहे. ही ऑफर 5 डिसेंबर रोजी बंद होईल. आतापर्यंत या ऑफरला 53.27 लाख शेअर्सच्या ऑफर मिळाल्या आहेत. तथापि, ओपन ऑफरमधील शेअरची किंमत NDTV च्या सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा खूपच कमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com