जाणून घ्या 'चार साल उत्तर प्रदेश बेहाल' का सर्वाधिक होतय ट्रेंड ?  

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 19 मार्च 2021

उत्तरप्रदेश मध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यामुळेच आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करण्याचे काम नेटकऱ्यांनी केल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

उत्तरप्रदेश मध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यामुळेच आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करण्याचे काम नेटकऱ्यांनी केल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सरकारच्या चार वर्षातील कामांवर नाराजी व्यक्त करत जोरदार फटकेबाजी केली आहे. (Read out why Uttar Pradesh is trending on Social Media)

उत्तरप्रदेश मध्ये 2017 साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले होते. आणि त्यानंतर 19 मार्च 2017 रोजी भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. व त्याच्या निमित्ताने नेटकऱ्यांनी हा मुद्दा चर्चेत आणल्याचे दिसत आहे. 

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड जे ऑस्टिन भारत दौर्‍यावर; या विषयांवर होणार खास...

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व आणि विकास या मुद्द्यांवर जोरदार प्रचार केला होता. त्यावेळी युवकांना दररोज 30 लाख रोजगार दिले जातील असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी केले होते. आणि नेमका हाच मुद्दा घेऊन नेटकऱ्यांनी रोजगार कुठे आहेत? असा प्रश्न सरकारला विचारला आहे. त्याच बरोबर सी.एम.आय.ई ने दिलेल्या अहवालातील राज्याच्या बेरोजगारीचा चढता आलेख सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये 2017 नंतर राज्यातील बेरोजगारी वाढत जात असल्याचे दिसते. 

तसेच एका अहवालानुसार उत्तर प्रदेशच्या पोलीस खात्यातील 1,11,865 जागा रिक्त असल्याच्या मुद्द्यावर सुद्धा नेटकऱ्यानी बोट ठेवलेले चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच निवडणुकीत नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी, युझर्स यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केल्याचे दिसत आहे. (Read out why Uttar Pradesh is trending on Social Media)

संबंधित बातम्या