तृणमूलचे बंडखोर खासदार सुनील मोंडालांना ‘टीएमसी’चा घेराव

PTI
रविवार, 27 डिसेंबर 2020

भाजपमध्ये प्रवेश करणारे तृणमूल कॉंग्रेसचे बंडखोर खासदार सुनील मोंडाल यांना तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मोंडाल यांना टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि घोषणाबाजी केली.

कोलकता :  भाजपमध्ये प्रवेश करणारे तृणमूल कॉंग्रेसचे बंडखोर खासदार सुनील मोंडाल यांना आज तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मोंडाल यांना काल  टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि घोषणाबाजी केली. सुनील मोंडाल आज कोलकता येथील भाजप कार्यालयात पोचले. तेव्हा तेथे हजर असलेल्या तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेरले. काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.

सुनील मोंडाल यांनी मागील आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गाडीसमोर काही वेळ गोंधळ घातला. या प्रकारामुळे तणाव झाला होता. काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचेवर बांगड्या फेकल्या तसेच दगडफेकही केली. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची होऊन वादावादी झाली. यावर मोंडाल म्हणाले की, आजच्या प्रकाराने तृणमूलचा खरा रंग समोर आला. ते लोकशाही तत्त्वावर विश्‍वास ठेवत नाहीत. एखाद्या लोकप्रतिनिधीला विरोध करण्यासाठी हा मार्ग योग्य आहे काय? असा प्रश्‍न त्यांनी केला. यावर तृणमूल कॉंग्रेसने दलबदलू लोकांविरुद्ध नागरिकांनी व्यक्त केलेला संताप आहे, अशी प्रतिक्रिया दिली. 

संबंधित बातम्या