Ankita Bhandari Murder : उत्तराखंडच्या 'त्या' रिसेप्शनिस्टचा बुडाल्याने मृत्यू

शवविच्छेदन अहवाल ः भाजप नेत्याच्या मुलावर हत्येचा आरोप
Ankita Bhandari
Ankita BhandariDainik Gomantak

उत्तराखंडमधील (Uttarakhand) अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील (Ankita Bhandari Murder Case) शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला असून यात अंकिताचा मृत्यू बुडून झाल्याचे म्हटले आहे. अंकिताच्या शऱीरावर जखमांचे व्रणही आढळले आहेत. तिला देहविक्री व्यवसायासाठी जबरदस्ती केल्याचे व्हॉटस्अॅप चॅटमधून (Whatsapp Chat) समोर आल्याची माहिती, पौरी गढवालचे पोलिस अधीक्षक यशवंत सिंग यांनी दिली.

Ankita Bhandari
CBI In Goa: बाल लैंगिक शोषण प्रकरणी सीबीआयची गोव्यात शोध मोहिम

भाजपचे माजी मंत्री विनोद आर्य (BJP Leader Vinod Arya) यांचा मुलगा पुलकीत याने अंकिताची हत्या केल्याचा संशय़ आहे. या प्रकरणात पुलकीतसह रिसॉर्टच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) अंकिता या तिघांसोबत जाताना दिसते. रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेली 19 वर्षीय अंकिता 18 सप्टेंबरपासून ती बेपत्ता होती. ऋषीकेश येथील चिल्ला कालव्यात शनिवारी तिचा मृतदेह सापडला होता. व्हॉटस्अॅपवरील खासगी संभाषण अंकिताने तिच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांकडे उघड केले होते. त्यामुळे संशयितांचा तिच्यावर राग होता. अनैतिक संबंधांस नकार दिल्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, अंकिताच्या वडिलांनी पुन्हा शवविच्छेदन (PM) करावे, अशी मागणी केली आहे.

Ankita Bhandari
Gomantak Exclusive: गोवा राज्यावरील अंमली पदार्थांचा विळखा सुटेल का?

जमावाने रिसॉर्टला लावली आग

या घटनेनंतर राज्यभरात लोकांचा उद्रेक झाला असून दोषींना फाशी देण्याची मागणी केली जात आहे. संतप्त जमावाने पुलकित आर्य याच्या रिसॉर्टला आग लावली. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढून या रिसॉर्टवर बुलडोझर फिरवला.

विनोद आर्य पक्षातून निलंबित

पुलकीतचे वडील विनोद आर्य आणि बंधू अंकित यांना भाजपने पक्षातून निलंबित केले आहे. राज्य सरकारने अंकित आर्य यांना ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदावरूनही हटवले आहे. धामी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.

महिलांनी आरोपींना दिला चोप

शुक्रवारी तिघाही आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेले जात असताना शेकडो महिलांनी पोलिसांची गाडी अडवून तिघाही आरोपींना चोप दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com