Delhi Tractor Parade Violence : लाल किल्ला हिंसाचाराचा आरोपी दीप सिद्धूला अटक

Delhi Tractor Parade Violence : लाल किल्ला हिंसाचाराचा आरोपी दीप सिद्धूला अटक
Red Fort violence during farmers tractor parade accused Deep Sidhu arrested

नवी दिल्ली. 26 जानेवारीला रोजी किसान ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धू याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूला पकडून देणाऱ्यांना 1 लाखांचे बक्षीस होते. सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. स्पेशल सेलचे डीसीपी संजीव यादव यांनी सिद्धूच्या अटकेची माहिती दिली. यादव म्हणाले की, मंगळवारी दिल्ली पोलिस पत्रकार परिषद घेऊन अटकेबाबत पुढील माहिती देतील. सिद्धूला कोठून अटक केली गेली याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

हिंसाचार झाल्यापासून सिद्धू फरार होऊन, वेगवेगळ्या ठिकाणांहून फेसबुक लाइव्ह करत होता. त्याने शेतकरी नेत्यांवरही गंभीर आरोप केले. दिल्ली पोलिस आपल्या पत्रकार परिषदेत सिद्धूवरील आरोपांचा खुलासा करणार आहेत. फेसबुक लाइव्ह दरम्यान कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक ट्रेसिंग टाळण्यासाठी सिद्धू परदेशात बसलेल्या एका महिला मित्राची मदत घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

दिप सिध्दू हा प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. या अभिनेत्याचे नाव समोर येताच शेतकरी नेत्यांनी आपले हात वर केले आहे. असा आरोप केला जात आहे की, या व्यक्तीने शेतकऱ्यांचे आंदोलन लाल किल्ल्याकडे वळवले, त्यानंतर हिंसाचार पसरला. हा अभिनेता भाजप तसेच आरएसएसचा एजंट असल्याचेही आरोप झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवणाऱ्या विरोधकांच्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर पंजाबी अभिनेता दीप सिध्दू याने या प्रकरणाच्यावेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे कबूल केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com