रेड लाईट ऑन-गाडी ऑफ केजरीवाल यांची मोहीम

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

 दिल्लीतील प्रदुषण कमी व्हावे म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक उपाय काढला आहे. लाल सिग्नलवर थांबावे लागल्यास वाहनाचे इंजीन बंद ठेवा असे आवाहन त्यांनी केले.

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदुषण कमी व्हावे म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक उपाय काढला आहे. लाल सिग्नलवर थांबावे लागल्यास वाहनाचे इंजीन बंद ठेवा असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी रेड लाईट ऑन-गाडी ऑफ अशी मोहिमेसाठी त्यांनी दिल्लीकरांना साद दिली.

सम-विषम क्रमांकाच्या वाहनांनी दिवसाआड रस्त्यावर धावण्याची मोहीम केजरीवाल यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केली होती. ते म्हणाले की, आधीच कोरोनामुळे लोक त्रस्त झाले आहेत, त्यात प्रदुषणामुळे आणखी भर नको.

माहिती
    1 कोटी : दिल्लीतील नोंदणीकृत वाहने 
   15-20 मिनिटे : एका दिवसात सिग्नलवर थांबण्याचा अंदाजे वेळ 
   200 मिलीलीटर : अकारण वाया जाणारे इंधन 
   7000 रुपये : वाहनागणिक वर्षाकाठी होणारी बचत

दिल्लीतील एक कोटीपैकी दहा लाख वाहनांनी जरी ही मोहीम राबविली तर 10 पर्यंत वाढलेला प्रदुषण निर्देशांक वर्षाला दीडने, तर 2.5 टनाने, निर्देशांक 0.4 टनाने कमी होईल असे तज्ज्ञांचे मत आहे.
- अरविंद केजरीवाल

 

संबंधित बातम्या