''इव्हेंटबाजी कमी करा, देशाला लस द्या''

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा आणि ज्या कोणाला कोरोना लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधितांची नोंद होत असून मृतांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकराकडून राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 11ते 14 एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे सर्व राज्यांना आवाहन देखील केलं आहे. मागील वर्षी देखील कोरोना विरोधातील लढाईला मजबूती देण्यासाठी लोकांना टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे त्याचबरोबर दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. मात्र देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसत नाही. आता लसीकरण मोहीमेमध्येही लसींच्या तुटवड्यामुळे अनेक अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर वायनाडचे खासदार आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. (Reduce event speculation vaccinate the country)

‘’385 दिवसामध्येही कोरोनाशी लढाई जिंकता आलेली नाही, उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला कोरोनाची लस द्या...’’  असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

सुप्रीम कोर्टाने कुरानमधील 26 आयते काढून टाकण्याची जनहित याचिका फेटाळली

तसेच, ‘’पंतप्रधान मोदी तुम्ही म्हणाला होतात की, कोरोना विरोधातील लढाई 18 दिवसांमध्ये जिंकता येईल. तुम्ही जनतेकडून टाळ्या-थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाईलची लाईट देखील लावायला लोकांना सांगितली मात्र कोरोना वाढतच गेला. आता देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि लाखो लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा आणि ज्या कोणाला कोरोना लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्य़ात पूर्णत:हा बंद करा आणि गरीब जनतेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा,’’ असं देखील राहुल गांधींनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.  

 

संबंधित बातम्या