मुलांवर लसीच्या ट्रायलला स्थिगितीस नकार; दिल्ली हायकोर्टाची केंद्राला नोटीस

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 मे 2021

दिल्ली उच्च न्यायालयाने भारत बायोटेकला 2-18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोवाक्सिनच्या क्लिनिकल चाचण्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील डीसीजीआयच्या मान्यतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने(Delhi high court) भारत बायोटेकला(bharat biotech) 2-18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोवाक्सिनच्या क्लिनिकल चाचण्यांच्या(clinical trials) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील डीसीजीआयच्या(DCGI) मान्यतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. मुख्य न्यायाधिश डीएन पटेल(Chief Justice DN Patel) आणि न्यायमुर्ती ज्योती सिंह(Justice Jyoti Singh) यांनी  केंद्र आणि भारत बायोटेक ला नोटीस(Notice) बजावली आहे. कोर्टाने नोटीस बजावताना क्लिनिकल चाचणीवर आपली भूमिकाही मांडायला सागितले आहे. यासह, दिल्ली उच्च न्यायालयाने क्लिनिकल चाचणीवर नोटीस बजावण्यास नकार दिला आहे. ही याचिका संजीव कुमार यांनी दाखल केली आहे.(Refusal to postpone vaccination trial on children Delhi High Court issues notice to Center)

Cyclone Tauktae: वादळामुळे अरबी समुद्रात अडकलेल्या ३४ जणांचा मृत्यू 

खरं तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी झगडणाऱ्या भारतामध्ये कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेतून लहान मुलांना वाचवण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने देखील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवाक्सिनच्या क्लिनिकल चाचणीस मान्यता दिली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल असे म्हटले जात आहे की या लाटेचा जास्तीत जास्त परिणाम लहान मुलांवर होण्याची शक्यता आहे.  

मंगळवारी एनआयटीआय सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी 2-18 वर्षांच्या मुलांसाठी कोरोना लसीबद्दल मोठी बातमी दिली. डॉ. व्हीके पॉल यांच्या मते, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ला 2-18 वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल चाचण्या मंजूर झाल्या आहेत. त्याची क्लिनिकल चाचणी 10 ते 12 दिवसांत सुरू होईल, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

...तर लसींच्या कमरतेचा प्रश्न 20 दिवसात मार्गी लागेल: नितीन गडकरी  

खरं तर, कोविड -19 'कोव्हॅक्सिनच्या 2 ते 18 वर्षांच्या मुलांवर' क्लिनिकल चाचणीसाठी 12 मे रोजी परवानगी मिळाल्याबद्दल कोर्टाने कोणताही अंतिम आदेश मंजूर करण्यास नकार दिला. 'क्लिनिकल चाचणी 525 निरोगी स्वयंसेवकांवर केली जाईल. यांना सुद्धा  28 दिवसांच्या फरकाने लसीचे दोन डोस दिले जातील. कोवाक्सिन हैदराबादस्थित भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांनी विकसित केली आहे. सध्या भारतात तिसऱ्या टप्प्यातील लसिकरणाला सुरवात झाली आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना लस दिली जात आहे. 

संबंधित बातम्या