18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी शासकीय केंद्रावर आता नोंदणीची गरज नाही 

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

केंद्र सरकारने कोविन प्लॅटफॉर्मवर 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाची पूर्व-नोंदणी आवश्यकता रद्द केली आहे.

केंद्र सरकारने कोविन प्लॅटफॉर्मवर 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाची पूर्व-नोंदणी आवश्यकता रद्द केली आहे. लसीसंदर्भात जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार आता या वयोगटातील लोकांना थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस मिळू शकते. तथापि, ही सुविधा फक्त सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. खाजगी लसीकरण केंद्रांवर पूर्वीच्या नोंदणीसारखी लस उपलब्ध होईल.(Registration at the government center is no longer required for vaccination between the ages of 18 to 44 years)

भारतात 'स्पुटनिक व्ही' लसीचं उत्पादन सुरु; वर्षाला 10 कोटी लस...

लसीचा अपव्यय रोखण्यासाठी निर्णय
आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ''लसीकरण केंद्रांवर नोंदणी आणि लस सुविधा देण्याचा निर्णय प्रामुख्याने लसीचा अपव्यय रोखण्यासाठी आहे. अनेक राज्यांमधून तक्रारी आल्या आहेत की ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांच्या निर्धारित दिवसापर्यंत पोहोचू न शकल्यामुळे लस वाया जात आहे. अशाप्रकारे ही लस आधी नोंदणी केलेल्या लोकांना दिली जाईल, तसेच उर्वरित लस तिथे येणाऱ्या लोकांना देण्यात येतील व त्यांची तेथेच  नोंद होईल. कोविन पोर्टलमध्ये यासाठी आवश्यक बदल केले गेले आहेत''.

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नोंदणीची कडक तरतूद
या महिन्यापासून सुरू झालेल्या तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण मोहिमेमध्ये सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे ठरवले. नवीन प्रणालीअंतर्गत, भारतात तयार होणारी 50 टक्के लस केंद्र आणि उर्वरित राज्ये आणि खाजगी रुग्णालयांना सामायिक केली जाईल.  लसीकरण केंद्रावरील  अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पूर्व-नोंदणीची कठोर तरतूद केंद्र सरकारने केली होती. या प्रणाली मागे दुसरा एक विचार होता तो म्हणजे कोरोना संक्रमणापासून लोकांचा बचाव होईल.   

Yellow Fungus: काळ्या आणि पांढऱ्या बुरशी नंतर आता आली "पिवळी बुरशी"

जूनपासून लहान मुलांवर लसीची चाचणी सुरू होईल
भारत बायोटेक जूनपासून लहान मुलांवर 'कोवॅक्सिन' लसीची चाचणी सुरू करू शकते. कंपनीला 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली आहे. या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीपर्यंत मुलांच्या लसीकरणासाठी परवाना मिळू शकेल असा विश्वास भारत बायोटेकच्या बिझिनेस डेव्हलपमेण्ट अँड इंटरनॅशनल अ‍ॅडव्होसीचे प्रमुख डॉ. राचेस एला यांनी व्यक्त केला. डॉ. एला म्हणाले की ''या वर्षाच्या अखेरीस भारत बायोटेक कोवॅक्सिनच्या उत्पादन क्षमतेत वाढ करून 70 कोटी करेल.

 

संबंधित बातम्या