Registration for Vaccine: कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताय? मग 'ही' बातमी वाचा

दैनिक गोमंतक
बुधवार, 28 एप्रिल 2021

देशांत आता 18 वर्षावरील लोकाना 1 मेपासून लसीकरण  करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आज, 28 एप्रिलपासून लसीकरणासाठी नोंदणी सुरू होणार आहे. 

नवी दिल्ली: देशांत आता 18 वर्षावरील लोकाना 1 मे पासून लसीकरण  करण्यात येणार असल्याची घोषणा  केंद्र सरकारने  केली आहे. तसेच आज, 28 एप्रिल पासून लसीकरणसाठी नोंदणी प्रक्रियादेखील सुरू झाली आहे.  अनेकांनी मध्यरात्रीपासूनच नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नोंदणी करताना त्यांची जन्म तारीख टाकताच 45 वर्षा नंतरचेच लोक नोंदणी करू शकतात असा एसएमएस (SMS) येत आहे. यामुळे सर्वांची गोंधळाची परिस्थिति निर्माण झाली आहे. (Registration for Vaccine: Do you register for Corona Vaccination? Then 'this' news) 

दरम्यान येत्या 1 मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा  सुरू होणार आहे. 18 ते 45 वर्ष वयोगटातील प्रत्येकाला लस मिळणार आहे. यासाठी कोविन संकेतस्थळावर आणि आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून नोंदणी करायची आहे. रजिस्ट्रेशन बुधवारी संध्याकाळी 4  वाजेपासून सुरू होणार आहे. तसेच 45 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी नोंदणी प्रक्रिया आधीसारखीच असणार आहे. नोंदणीशिवाय लसीकरण होणार नाही. 

लसीकरणसाठी 18 वर्ष वय पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. यासाठी  www.covin.gov.in  किंवा cowin app वर नोंदणी करु शकता. यामध्ये तुम्हाला तुमचं मोबाइल नंबर नोंद करावा लागेल. ते करताना तुमच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसन्स   किंवा  मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.   

covid-19 vaccine - 18 वर्षावरील नागरीकांनी लसीकरणासाठी असं करा रजिस्ट्रेशन

जाणून घ्या नोंदणी कशी कराल?   

- www.covin.gov.in या अधिकृत साईट किंवा कोविन अॅपवर तुम्हाला मोबाइल नंबर किवा आधार नंबर द्यावा लागेल.

- त्यानंतर तुमच्या मोबाइल वर एक ओटीपी (OTP) येतो तो सबमिट  करावा लागतो. 

- लॉगिन केल्याननंतर Vassine Registraction फॉर्म भरावा लागतो.

- तुम्हाला लस कधी घ्यायची आणि कोणत्या वेळात घ्यायची हे ठरवता येतं. 

- त्यासाठी एक नावाची यादी येते आणि त्यासमोरच दिनदर्शिका  दिसते. तिथून तारीख निवडता (confirm) येते. 

- अपॉईंटमेंट बूक करून ती confirm करा. 

- अपॉईंटमेंट डिटेल्सचा मेसेज मोबाइलवर येतो. 

- तो मेसेज जतन करून ठेवा, लसीकरण सेंटरवर तुमचे ओळखपत्र आणि हा मेसेज दाखवावा.    

कोविड लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आयडी मिळेल. त्यावरूनच तुम्हाला लसीकरणाचे सर्टिफिकेट मिळेल.
 

संबंधित बातम्या